Asian Games 2023  esakal
क्रीडा

Asian Games 2023 : भारतीय हॉकी संघाने गाठली फायनल; कोरियाचा पराभव करत रौप्य पदक केलं निश्चित

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : भारतीय पुरूष हॉकी संघाने सेमी फायनल सामन्यात कोरियाचा 5 - 3 अशा गोलफरकाने पराभव करत अंतिम फेरी गाठली. याचबरोबर भारताचे रौप्य पदक निश्चित झाले असून ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या हॉकी संघाकडून आता सुवर्ण पदकाची आशा आहे.

भारतीय पुरूष हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा सेमीफायनलमध्ये पराभव करत सुवर्ण पदकाच्या दृष्टीने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. याचबरोबर हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत स्थान मिळवण्याच्या दृष्टीने देखील फायलनमध्ये जोर लावणार आहे.

एशियन गेम्स 2023 मध्ये भारताने पदकांचं शतक ठोकण्याचा निर्धार केला आहे. हे स्वप्न दृष्टीपथात दिसत आहे. सध्या भारताच्या खिशात 74 पदके आली आहे. एशियन गेम्सची सुरूवात 1951 मध्ये झाली होती. तेव्हापासून भारताने पदकांची 70 काही पार केली नव्हती. जकार्तामध्ये झालेल्या 2018 च्या एशियन गेम्समध्ये भारताने सर्वाधिक 70 पदके पटकावली होती.

आज भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम आणि ओजस देवताळे यांनी भारताला 16 वे सुवर्ण पदक जिंकून दिले. त्यांनी आर्चरी मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकले. यानंतर बॉक्सिंगमध्ये लवलिना बोरगोहेनने रौप्य, परवीन हुड्डाने कांस्य पदक जिंकले. याचबरोबर स्क्वॉशमध्ये भारताच्या अभय सिंह आणि अनहत सिंहने मिश्र दुरेहीत कांस्य पदक पटकालवे. तर चालण्याच्या शर्यतीत राम बाबू आणि मनू राणी यांनी देखील कांस्य पदकाची कमाई केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT