Asian Games 2023 Squash  esakal
क्रीडा

Asian Games 2023 : भारताच्या मुलींनी पाकिस्तानच्या खेळाडूंना पळवून पळवून हरवलं; स्क्वाशच्या संघाची दमदार कामगिरी

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : भारताच्या पुरूष आणि महिला स्क्वाश संघाने एशियन गेम्स 2023 मध्ये दमदार सुरुवात केली. पुरूष संघाने सिंगापूरचा तर महिला संघाने पाकिस्तानचा पराभव केला. महिला संघातील जोशना चिनप्पा, 15 वर्षाची अनाहत सिंह आणि तन्वी खन्ना यांनी पाकिस्तानच्या महिला संघाचा 3 - 0 असा पराभव केला. पुरूष संघातील हरिदर पाल संधू, सौरव घोषाल, अभय सिंह यांनी विजय मिळवला.

एशियन गेम्समध्ये पदार्पण करणाऱ्या अनाहत सिंहने आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या सादिया गुलचा 16 मिनिटात 11 - 6, 11-6, 11-3 असा पराभव केला. तर अनुभवी जोशना चिनप्पा सहाव्यांदा एशियन गेम्समध्ये सहभागी झाली आहे. तिने सादियाला 11-2, 11-6, 11-2 असा पराभूत करत भारताचे वर्चस्व कायम केले.

महिला स्क्वाश स्पर्धेत पूल अ आणि पूल ब मधील पहिले दोन संघ सेमी फायनलसाठी पात्र होणार आहेत. पूल ब मध्ये भारत, पाकिस्तान, मलेशिया, चीन आणि नेपाळ संघाचा समावेश आहे.

पुरूषांच्या संघात दुखापतीतून सावरणाऱ्या रहिंदरला सुरूवातीच्या सामन्यात सिंगापूरच्या जेरोम क्लेमेंटने कडवी टक्कर दिली. मात्र 39 मिनिटे चाललेल्या या सामन्यात हरिंदरने 11-4, 13-11, 8-11, 11-7 असा सामना जिंकला. सोशनाप्रमाणे आपल्या सहाव्या एशियन गेम्समध्ये सहभागी होणाऱ्या घोषालने सॅम्युअल कंगचा 11-9, 11-1, 11-4 ने पराभव केला. तर अभय सिंहने मार्कस फुआचा 1-7, 11-7, 11-7 असा पराभव केला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat-Assam Flood Crisis : गुजरात अन् आसामवर आभाळ फाटलं; मुसळधार पावसामुळे पूर, जनजीवन विस्कळीत.. 872 गावे पाण्याखाली

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान, २००हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

Latest Marathi News Live Update : दिल्लीत हाय अलर्ट! सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द, अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश

Dharmendra Pradhan salary : केंद्रीय कॅबिनेट शिक्षण मंत्र्यांवर सरकारचा दरमहा किती खर्च? धर्मेंद्र प्रधान यांच्या उदाहरणातून समजून घ्या

Sonam Wangchuk Video : सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडले, सरकारशी काय चर्चा झाली? व्हिडिओ शेअर करत सगळंच सांगितलं

SCROLL FOR NEXT