Asian Games Women's Hockey eSakal
क्रीडा

Asian Games : भारताच्या वुमेन्स हॉकी टीमची कमाल! पहिल्याच सामन्यात सिंगापूरवर '13-0'ने केली मात

Indian Women's Hockey : भारताच्या संगीता कुमारीने गोल्सची हॅटट्रिक केली.

Sudesh

एशियन गेम्समध्ये भारताची घोडदौड सुरू आहे. आज सकाळपासून कित्येक स्पर्धांमध्ये खेळाडूंनी पदकं जिंकली आहेत. महिला हॉकी संघानेही आपली सुरुवात सिंगापूरला व्हाईट वॉश देऊन केली आहे.

भारतीय महिला हॉकी संघाने सिंगापूरचा 13-0 एवढ्या फरकाने धुव्वा उडवला आहे. भारताच्या संगीता कुमारीने गोल्सची हॅटट्रिक केली. तर, नवनीत कौरने दोन गोल केले. याव्यतिरिक्त दीपिका, सुशिला चानू, उदिता, नेहा, दीप ग्रेस एक्का, सलीमा तेते, वंदना कटारिया आणि मोनिका या सर्वांनी एक-एक गोल केला.

पहिल्या पंधरा मिनिटांमध्येच भारत 5-0 ने आघाडीवर होता. त्यानंतर पुढील क्वार्टरमध्ये सिंगापूरने चांगली टक्कर दिली. तरीही भारताने आणखी तीन गोल केले. त्यानंतर पुढच्या क्वार्टरमध्ये सिंगापूरने आक्रमक पवित्रा घेत गोल्स करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश मिळाले नाही. या क्वार्टरमध्ये भारताने आणखी एक गोल केला.

शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताने जोरदार मुसंडी मारत आणखी चार गोल केले. सिंगापूरला संपूर्ण मॅचमध्ये गोल करण्याची संधी न देता भारताने 13-0 अशा फरकाने ही मॅच खिशात घातली. आता महिलांच्या हॉकी संघाची पुढील मॅच मलेशिया विरुद्ध असेल. हा सामना 29 सप्टेंबर रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Farmers Protest: संतापलेल्या शेतकऱ्यांकडून रस्त्यावरच धान रोवणी ; ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराचा नोंदवला निषेध

Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

पु. ल. देशपांडेंची 'बटाट्याची चाळ' नव्या रूपात! रंगभूमीवर रंगणार भव्य सांगीतिक प्रयोग

Latest Marathi News Live Update : 'तावडे हॉटेल' अतिक्रमणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार

Maharashtra Farm Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी; दुसरी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

SCROLL FOR NEXT