Asian Games : अवघ्या 9 बॉलमध्ये केली फिफ्टी! नेपाळच्या दिपेंद्र सिंगने मोडला युवराज सिंगचा रेकॉर्ड

Dipendra Singh Airee : टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड आता दिपेंद्रच्या नावावर झाला आहे.
Asian Games Dipendra Singh Airee
Asian Games Dipendra Singh AireeeSakal

नेपाळच्या दिपेंद्र सिंग ऐरी या खेळाडूने एशियन गेम्समध्ये एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड आता दिपेंद्रच्या नावावर झाला आहे. अवघ्या 9 बॉलमध्ये फिफ्टी करून त्याने भारताच्या युवराज सिंगचा रेकॉर्डही मोडला आहे.

एशियन गेम्समध्ये आज (27 सप्टेंबर) नेपाळ विरुद्ध मंगोलिया टी-20 मॅच सुरू होती. या मॅचमध्ये नेपाळने अगदी जबरदस्त कामगिरी केली. नेपाळने मंगोलिया विरोधात 314 धावांचा डोंगर उभारला. टी-20 प्रकारात कोणत्याही टीमने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. T20 मध्ये 300 धावांचा टप्पा ओलांडणारी नेपाळ पहिलीच क्रिकेट टीम ठरली आहे.

Asian Games Dipendra Singh Airee
Asian Games : नेमबाजी प्रकारातील सांघिक गटात भारताची सुवर्ण कामगिरी; आतापर्यंतचे दुसरे पदक

फास्टेस्ट फिफ्टी

नेपाळच्या दिपेंद्र सिंग ऐरीने अवघ्या नऊ बॉलमध्ये फिफ्टी करून, भारताच्या युवराज सिंगचा 16 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला. युवराजने 2007 साली झालेल्या T20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरोधात सर्वात फास्ट फिफ्टी केली होती.

दिपेंद्र दहाच चेंडू खेळला, मात्र यामध्ये त्याने आठ षटकार मारले. तो 52 धावांवर नाबाद राहिला.

नेपाळच्या खेळाडूचं पहिलं शतक

नेपाळच्या कुशल मल्ला याने 34 बॉलमध्ये शतक ठोकलं. टी-20 क्रिकेटमध्ये सेंच्युरी करणारा कुशल हा नेपाळचा पहिलाच क्रिकेटर ठरला.

Asian Games Dipendra Singh Airee
Asian Games 2023 : भारतीय घोडेस्वारांची ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी; जिंकलं 41 वर्षातलं पहिलं पदक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com