Asif Ali-Fareed Ahmad Fight 
क्रीडा

Asif Ali-Fareed Ahmad Fight : मैदानातच भिडले पाक-अफगान खेळाडू, मारण्यासाठी उचलली बॅट

अखेरच्या षटकात सामना इतका तणावपूर्ण झाला की दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये मैदानावरच भांडणं झाली

Kiran Mahanavar

Asif Ali-Fareed Ahmad Fight Asia Cup 2022 : आशिया चषक टी-20 स्पर्धेच्या 'सुपर फोर' सामन्यात पाकिस्तानने बुधवारी अफगाणिस्तानचा एका विकेटने पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले. 129 धावांचा बचाव करताना अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानला कडवी झुंज दिली, पण अखेरीस पाकिस्तानने हा सामना जिंकला. अखेरच्या षटकात सामना इतका तणावपूर्ण झाला की दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये मैदानावरच भांडणं झाली.

अखेरच्या दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. झालं असं की, 19 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अफगाण गोलंदाज फरीद अहमदच्या चेंडूवर पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली मोठा शॉट खेळताना झेलबाद झाला. यानंतर अफगाण गोलंदाज फरीद अहमदने आक्रमक पद्धतीने आसिफ अलीच्या दिशेने आनंद साजरा केला. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडू संतापला. फरीद अहमदच्या जल्लोषाच्या स्टाईलने संतापलेल्या आसिफ अलीने आधी त्याला धक्का दिला आणि नंतर त्याची बॅट दाखवली. आसिफ अलीने बॅट उचलली तेव्हा अफगाणिस्तानच्या इतर खेळाडूंनी मध्यभागी येऊन त्याला रोखले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नाणेफेक हारल्यानंतर अफगाणिस्तान संघाने 20 षटकांत 6 बाद 129 धावा केल्या आणि पाकिस्तान संघाला विजयासाठी 130 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 19.2 षटकांत 9 गडी गमावून 131 धावा केल्या आणि सामना जिंकला. आशिया कप टी-20 स्पर्धेतील 'सुपर फोर' सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले. पाकिस्तानच्या या विजयामुळे अफगाणिस्तानसह भारतीय संघाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT