VIDEO : अफगाणिस्तानच्या चाहत्यांचे लाजिरवाणे कृत्य, हरल्यानंतर पाकच्या चाहत्यांना मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pakistan vs afghanistan Fans Fight watch video

VIDEO : अफगाणिस्तानच्या चाहत्यांचे लाजिरवाणे कृत्य, हरल्यानंतर पाकच्या चाहत्यांना मारहाण

Pakistan vs Afghanistan Fans Fight Watch video : क्रिकेटच्या मैदानावर विजय आणि पराभव स्वीकारणे सोपे नाही. आशिया कप 2022 मध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याने हे पुन्हा स्पष्ट झाले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानचा विजय झाला पण या रोमहर्षक सामन्यानंतर जे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत त्यामुळे क्रिकेटलाही लाजवेल असे आहे. शारजाह स्टेडियमच्या आतून आणि बाहेरून अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये प्रत्यक्षात सामना हरल्यानंतर अफगाणिस्तानचे चाहते पाकिस्तानी चाहत्यांना स्टेडियममध्येच मारहाण करताना दिसत आहे. तसेच त्यांनी मैदानातील खुर्च्याही उखडून टाकल्या.

पाकिस्तानी चाहत्यांला एका अफगाण चाहत्याने खुर्च्या मारल्याचा व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर वादावादी सुरू झाली, त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. एका व्हिडिओमध्ये काही अफगाण चाहते खुर्च्या उखडून फेकताना दिसत आहेत. दुसरे दृश्य स्टेडियमच्या बाहेरचे आहे ज्यामध्ये पाकिस्तानी आणि अफगाण चाहते भांडताना दिसत आहेत.

आशिया कप सुपर 4 च्या चौथ्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानविरूद्ध फक्त 130 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र या माफक आव्हान पार करताना देखील अफगाणी गोलंदाजांनी पाकिस्तानला घाम फोडला. अखेर नसीम शाहने शेवटच्या षटकात सलग दोन षटकार मारत पाकिस्तानला फायनलचा रस्ता दाखवला. पाकिस्तानने 1 विकेट्सनी निसटता विजय मिळवला. भारतासाठी देखील हा सामना महत्वाचा होता. मात्र नसीम शाहच्या सलग दोन षटकारांनी या आशा देखील धुळीस मिळवल्या.

Web Title: Pakistan Vs Afghanistan Fans Fight Watch Video After Afghanistan Lost Asia Cup 2022 Match Sports

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..