AUS vs PAK Test David Warner marathi news 
क्रीडा

Aus vs Pak Test : शेवटच्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा! दिग्गज खेळाडूला मिळणार अखेरचा निरोप

Kiran Mahanavar

Australia vs Pakistan Sydney Test : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रविवारी 31 डिसेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटीसाठी 13 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.

एमसीजी कसोटीचा भाग असलेल्या याच 13 खेळाडूंची तिसऱ्या कसोटीसाठी निवड करण्यात आली आहे. मेलबर्नमध्ये पाकिस्तानला 79 धावांनी पराभूत करून ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली होती, आता 3 जानेवारीपासून सुरू होणारा शेवटचा सामना जिंकून यजमानांचा पाकिस्तानचा सूपडा साफ करण्याकडे लक्ष असेल.

ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी नुकतेच संकेत दिले होते की, सिडनी कसोटीत संघ ज्या बॉलिंग युनिटसह मेलबर्नला उतरला होता त्याच बॉलिंग युनिटसह तो उतरेल.

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांना मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. संघाला 17 जानेवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली कसोटी खेळायची आहे. या मालिकेत उस्मान ख्वाजासोबत डावाची सलामी कोण देणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

खरं तर, नियमित सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर सिडनीमध्ये पाकिस्तानविरुद्धची शेवटची कसोटी खेळणार आहे. आणि लाल चेंडूच्या क्रिकेटला अलविदा करणार आहे. अशा परिस्थितीत मार्कस हॅरिस, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट आणि मॅट रेनशॉ हे त्याच्या जागी प्रतिस्पर्धी सलामीच्या फलंदाजांच्या यादीत आघाडीवर आहेत, तर निवडकर्त्यांनी ही भूमिका पार पाडण्यासाठी ग्रीन किंवा इतर कोणत्याही खेळाडूला आणण्याची शक्यता नाकारली नाही.

मुख्य निवडकर्ते जॉर्ज बेली म्हणाले, 'आम्ही कसोटी मालिकेत पाकला क्लीन स्वीप करू पाहत आहे, त्यामुळे मेलबर्न ते सिडनी हाच संघ कायम ठेवला आहे. डेव्हिड वॉर्नरचा शेवटचा कसोटी सामना आणि त्याच्या घरच्या मैदानावर त्याची अविश्वसनीय कारकीर्द साजरी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT