VIDEO: 'मला वाटलं भाऊ, गेला...' ऋषभ पंतच्या अपघातानंतर एक वर्षांनी मित्राने केला मोठा खुलासा

Rishabh Pant Accident
Rishabh Pant Accidentsakal

30 डिसेंबर 2022 रोजी असे काही घडले होते की त्यानंतर भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसला. त्या दिवशी टीम इंडियाचा स्टार ऋषभ पंत एका भीषण कार अपघाताचा बळी ठरला होता. आता त्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. ऋषभ पंतला मैदानात परतण्यासाठी अजून वेळ आहे. पण, ते परत येईल अशी आशा नक्कीच आहे.

त्या अपघात पंत थोडक्यात बचावला होता. पंतला अनेक गंभीर दुखापती झाल्या, पण आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. आता वर्षभरानंतर टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू आणि पंतचा जिवलग मित्र अक्षर पटेल याने त्याच्या अपघाताबाबत नवा खुलासा केला आहे.

Rishabh Pant Accident
Sa vs Ind 2nd Test : विराट कोहलीचा उत्तराधिकारी 'प्रिन्स' शुभमन गिल कसोटी क्रिकेटमध्ये होतोय का फ्लॉप?

सकाळी नववर्षानिमित्त पंत एकटाच घरी जात असताना हा अपघात झाला होता. दिल्ली-रुरकी महामार्गावर त्याची कार भरधाव वेगात दुभाजकावर आदळली. त्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली.

दिल्ली कॅपिटल्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अक्षर पटेल म्हणाला की, 'सकाळी 7 किंवा 8 वाजले होते. मला प्रतिमा दी चा फोन आला. त्यांनी विचारले की तू ऋषभशी शेवटचे कधी बोललास? मी म्हणालो, उद्या करणार आहे फोन. तिवा प्रतिमा दी म्हणाली की, तुझ्या जवळ ऋषभच्या आईचा नंबर असेल तर मला पाठव, तिचा अपघात झाला आहे.

आधी मला वाटलं की भाऊ आता गेला. बीसीसीआयचे सर्व कॉल्स, टीम इंडियातील काही खेळाडूंचे फोन मला आले. कारण पंत माझ्याशी शेवटचा बोलला असले असं सगळ्यांना वाटत होतं.

त्यानंतर मी त्याच्या भावाला कॉल केला, तो म्हणाला सर्व काही ठीक आहे, मला माहित नाही की त्याला किती दुखापत झाली आहे, तो सुरक्षित आहे. हे ऐकून मी फोन ठेवला.

ऋषभ पंत आयपीएल 2024 मध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 19 डिसेंबर रोजी पंत दिल्ली कॅपिटल्ससह मिनी लिलावात दिसला. आणि सौरव गांगुलीनेही पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. गेल्या मोसमात पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने संघाची कमान सांभाळली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com