Babar Azam Captaincy esakal
क्रीडा

Babar Azam Captaincy : बाबर आझम पुन्हा होणार पाकिस्तानाचा कर्णधार; पीसीबी घेणार यू टर्न?

Babar Azam Captaincy : नवीन पीसीबी चेअरमन नियुक्ती होताच संघात वाहू लागलेत कर्णधार बदलाचे वारे

अनिरुद्ध संकपाळ

Babar Azam Captaincy : पाकिस्तान क्रिकेट बोर्डात कधी काय होईल याचा कोणीही अंदाज वर्तवू शतक नाही. गेल्या वर्षी भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपनंतर बाबर आझमने पाकिस्तानचे कर्णधारपद सोडलं होतं.

त्यानंतर मर्यादित षटकांचा कर्णधार म्हणून शाहीन आफ्रिदी आणि कसोटीचा कर्णधार म्हणून शान मसदूची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र पाकिस्तान संघाची सध्याची कामगिरी पाहता आता संघाच्या नेतृत्वात पुन्हा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाकिस्तानने वर्ल्डकपनंतर कर्णधार बदलला. मात्र त्यांच्या कामगिरीत काही बदल झाला नाही. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका 3 - 0 ने गमावली. त्यानंतर न्यूझीलंडकडून पाकिस्तानला 4 - 1 असा पराभव सहन करावा लागला. यानंतर पाकिस्तानातील क्रिकेट जवळून पाहणाऱ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीसीबी आपल्या निर्णयापासून यू टर्न घेण्याची शक्यता आहे.

पीसीबीचे नवे चेअरमन मोहसिन नक्वी हे पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा निर्णय हा बाबर आझमला पुन्हा कर्णधार करणं हा असू शकतो.

पाकिस्तान प्रीमियर लीगनंतर पाकिस्तानचा संघ हा इंग्लंडविरूद्ध 4 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर संघ टी 20 वर्ल्डकप खेळण्यासाठी वेस्ट इंडीजमध्ये दाखल होईल. दरम्यान, बाबर आझम पुन्हा कधी कर्णधारपद आपल्याकडे घेतो हे अजून गुलदस्त्यात आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan: पेपरफुटीविरोधात आंदोलन करताना धर्मेंद्र प्रधानांना झाली होती मारहाण, १९९७ चा किस्सा पुन्हा चर्चेत!

Sikkim Tunnel Collapse : सिक्कीममध्ये बोगद्यात भूस्खलन २२ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू; पोलिस अधिक्षकांनी दिली माहिती

Latest Marathi Update : भाजपकडून बाहेरून गुंड पाठवून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न : अभिजीत दिपके

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार सुरूच, लोकल सेवेवर परिणाम; पालघरमध्ये पूरस्थिती, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

घरातील हिरवाई : स्फूर्तीचा झरा

SCROLL FOR NEXT