Ravichandran Ashwin TNPL 2024 : अश्विनने तामिळनाडू प्रीमियर लीगच्या लिलावात घेतला सहभाग; चर्चांना उधाण

Ravichandran Ashwin TNPL 2024 : अश्विन इंग्लंडविरूद्धच्या दोन सामन्यानंतर थेट पोहचला लिलावात
Ravichandran Ashwin TNPL 2024
Ravichandran Ashwin TNPL 2024esakal

Ravichandran Ashwin TNPL 2024 : भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये दिंडीगुल ड्रॅगन्सकडून खेळतो. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दोन कसोटी सामने झाल्यानंतर 9 दिवसांचा गॅप आहे. दरम्यान अश्विनने तामिळनाडू प्रीमियर लीगच्या लिलावाला हजेरी लावली. त्याला दिंडीगुल ड्रॅगन्सने रिटेन केलं आहे.

Ravichandran Ashwin TNPL 2024
U19 World Cup 2024 : भविष्यातील भारतीय संघाचे 'पाच' शिलेदार; U19 वर्ल्डकप गाजवला आता...

रविचंद्रन अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरूद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दोन विकेट्स घेतल्यानंतर हा माईल स्टोन पार केला होता. त्याने इंग्लंविरूद्ध 97 विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी बीएस चंद्रशेखर यांच्या नावावर हा विक्रम होता. सध्या अश्विन कसोटीत 500 विकेट्स घेण्यापासून एक विकेट दूर आहे. त्याने 499 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, दुसऱ्या सामन्यानंतर तामिळनाडू प्रीमियर लीगच्या लिलावाला हजेरी लावल्यानंतर अश्विन म्हणाला की, 'मी तामिळनाडू क्रिकेटसाठी वचनबद्ध आहे. मी ज्यावेळी तामिळनाडूकडून क्रिकेट खेळतो मग ते क्लब क्रिकेट असो किंवा रणजी ट्रॉफी असो मी पॅशिनेटलीच खेळतो.'

'मी जेवढं क्रिकेट खेळेन तेवढा मी चांगला क्रिकेटर होईन. तामिळनाडू क्रिकेटने मला जेवढं दिलं आहे तेवढं मी तामिळनाडूसाठी करणार आहे. मला हे करताना आनंद मिळतो. इतरांप्रमाणे मी कोणत्याही इतर कराणासाठी हे करत नाही.'

Ravichandran Ashwin TNPL 2024
Jasprit Bumrah ICC Ranking : रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठत जसप्रीत बुमराहने इतिहास रचला

दिंडीगुल ड्रॅगन्स संघ

आदित्य जी, अफान खादेर एम. आर. अश्विन, भूपती वैशना कुमार, दिरन व्हीपी, किशोर जी, वरूण चक्रवर्ती. बाबा इंद्रजीत, शरद कुमार सी, शिवम सिंग, सुबोध कुमार भाटी, विमल कुमार आर, विग्नेश पी, संदीप वॉरियर.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com