Babar Azam sympathises with out of-form Virat Kohli esakal
क्रीडा

Virat Kohli : 'ही वेळ देखील निघून जाईल' बाबर आझमची भावनिक पोस्ट

धनश्री ओतारी

बीसीसीआयने वेस्टइंडीजविरुद्धच्या सामन्यांसाठी भारताचा टी20 संघ जाहीर केला असून यावेळी स्टार फलंदाज विराट कोहलीला संधी न मिळाल्याने सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं आहे. विराट सध्या खराब फॉर्मशी झगडताना दिसत आहे. अनेक क्रिकेट पंडित त्याच्यावर टीका करताना दिसत आहेत. विराट कोहलीवरुन सध्या भारताच्या माजी क्रिकेटपटूंमध्येच दोन गट पडलेत. अशातच पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजमने विराटसाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.(Babar Azam sympathises with out of-form Virat Kohli)

भारत आणि इंग्लंड़ दुसरा एकदिवसीय सामना झाला. लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात विराट केवळ १६ धावांच करु शकला. त्यानंतर पुन्हा त्याच्यावर टीकेची झोड उठली. दरम्यान, बाबर आजमने ट्विट करत विराटला आधार देण्याचा प्रयत्न केला. ‘ही वेळही निघून जाईल, मजबूत रहा’ असा संदेश लिहिताना त्याने विराट सोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे.

लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने भारताचा 100 धावांनी दारुण पराभव केला. रीस टॉपली इंग्लंडच्या विजयाचा नायक ठरला. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने भारताचं कंबरड मोडलं. पहिल्या वनडेत भारतासाठी जसप्रीत बुमराहने जशी कामगिरी केली होती, दुसऱ्या वनडेत रीस टॉपलीने इंग्लंडसाठी ते करुन दाखवलं. त्याने 9.5 षटकात 24 धावा देत 6 विकेट घेतल्या. यात दोन 2 निर्धाव षटकं होती.

तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने आधी 1-0 अशी आघाडी घेतली होती. इंग्लंडने आता 1-1 अशी बरोबरी साधली आहे. रविवारी होणारा तिसरा एकदिवसीय सामना निर्णायक ठरेल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव 49 षटकात 246 धावांवर आटोपला. भारताचा डाव 146 धावांवर संपुष्टात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aamir Khan Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आमिर खानची पहिली प्रतिक्रिया; '3 इडियट्स'मधील रँचोबाबत केला मोठा खुलासा

Petrol-Diesel Price: १७ जुलैला इंधनाचे ताजे दर जाहीर! कच्चे तेल १२ टक्क्याने महागल्यानंतर महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल कितीला?

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Pune Crime : कोथरूड हल्ला प्रकरणातील घायवळ टोळीच्या गुंडाला मुंबईतून अटक, व्यावसायिकावर कोयत्याने केले होते वार

Tukaram Mundhe : फरक पडतो... फक्त 'तुकाराम' लागतात! FDA आयुक्त मुंढेंचा राज्यभरात धडाका; गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाचे धाबे दणाणले, आता पुढचा नंबर कोणाचा?

SCROLL FOR NEXT