malaysia masters pv sindhu hs prannoy kidambi srikanth advance to quarters lakshya sen crashes out sakal
क्रीडा

Badminton club : पी. व्ही. सिंधू, प्रणॉय, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : लक्ष्य सेनचे आव्हान मात्र संपुष्टात

सकाळ डिजिटल टीम

क्वालालम्पूर - भारताची ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने महिला एकेरीत आणि किदांबी श्रीकांत व एच. एस. प्रणॉय यांनी पुरुष एकेरीत प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत मलेशिया मास्टर्स सुपर ५०० स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लक्ष्य सेन याचे आव्हान मात्र गुरुवारी संपुष्टात आले.

सहावी सीडेड सिंधू हिने जपानच्या एया ओहोरी हिच्यावर २१-१६, २१-११ असा विजय मिळवला. भारताच्या फुलराणीने ४० मिनिटांमध्ये विजयाला गवसणी घातली. सिंधूने जपानच्या खेळाडूला १३ व्यांदा पराभूत केले हे विशेष. सिंधूसमोर उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या यी मान झँग हिचे आव्हान असणार आहे.

प्रणॉयला मात्र चीनच्या ली शि फेंग याच्यावर विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. फेंग याने पहिला गेम २१-१३ असा जिंकत १-० अशी आघाडी घेतली. प्रणॉयने पुढील दोन्ही गेममध्ये वर्चस्व गाजवले. दुसरा गेम त्याने २१-१६ असा खिशात टाकला. अखेरच्या गेममध्ये त्याने २१-११ अशी बाजी मारली. प्रणॉयने ही लढत १ तास व १० मिनिटांमध्ये जिंकली.

पुरुषांच्या एकेरीत भारताच्या आणखी एका खेळाडूने यश मिळवले. श्रीकांतने आठव्या मानांकित कुनलावूत विदीतसर्ण याच्यावर रोमहर्षक विजय साकारला. श्रीकांतने दोन्ही गेममध्ये दबावाखाली खेळ उंचावला आणि विजय संपादन केला. श्रीकांतने दोन्ही गेम प्रत्येकी २१-१९ अशा फरकाने जिंकले हे विशेष.

भारताच्या खेळाडूचा पराभव

भारताच्या तीन खेळाडूंनी एकेरीत आगेकूच केली असतानाच लक्ष्य सेनला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. एनजी लाँग अँगस याने लक्ष्यवर २१-१४, २१-१९ असा विजय मिळवला. लक्ष्य याला ४८ मिनिटांमध्ये हार पत्करावी लागली. लक्ष्यचा सुमार याही स्पर्धेदरम्यान कायम राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT