Pune Traffic Police : नो पार्किंगमध्ये वाहन लावताना जरा जपूनच; दंडाची रक्कम डेबिट, क्रेडिट कार्डद्वारेच स्वीकारणार

नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या दुचाकीस्वारांना पहिल्यांदा टोइंगसह ७८५ रुपये, मोटारचालकांना एक हजार ७१ रुपये दंड आकारण्यात येणार
No Parking Penalty amount will accepted through debit credit card only fine traffic rule police
No Parking Penalty amount will accepted through debit credit card only fine traffic rule police esakal

पुणे : शहरात नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या दुचाकीस्वारांना पहिल्यांदा टोइंगसह ७८५ रुपये, मोटारचालकांना एक हजार ७१ रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तर दुसऱ्यांदा नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास अनुक्रमे एक हजार ७८५ रुपये आणि दोन हजार ७१ रुपये दंड भरावा लागणार आहे. यामुळे नो पार्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांवर चाप बसणार आहे.

वाहनचालकांकडून दंडाची रक्कम आकारताना वाहनचालक आणि पोलिस यांच्यात अनेकदा वाद होतात. या पार्श्वभूमीवर मोटार व्हेइकल ॲक्टनुसार शहर वाहतूक शाखेने दंडाच्या रकमेबाबत सूचनापत्र जारी केले आहे.

वाहतूक पोलिस अंमलदार दंडाची रक्कम रोख स्वरुपात घेत नाहीत. दंडाची रक्कम भरण्यासाठी क्यूआर कोडचा पर्याय इ-चलन मशिनवर उपलब्ध नाही. त्यामुळे यूपीआय पेमेंट स्वीकारता येत नाही. केवळ डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारेच दंडाची रक्कम घेतली जाते.

No Parking Penalty amount will accepted through debit credit card only fine traffic rule police
Traffic Problem : महामार्गावरील वाहतूक कोंडी नित्याचीच! लग्न तिथींमुळे स्थिती

नो पार्किंगमधून वाहन उचलल्यानंतर दंडाची रक्कम भरताना संबंधित वाहनावर पूर्वीच्या दंडाची रक्कम प्रलंबित असल्यास कमीत कमी एक दंड भरावा लागेल. त्यामुळे कमीत कमी दोन चलनाची रक्कम भरल्याशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. वाहतूक पोलिस या मशिनमध्ये बदल करू शकत नाहीत. त्यामुळे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांसोबत वाद घालू नयेत, असे आवाहन वाहतूक शाखेने जारी केलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

No Parking Penalty amount will accepted through debit credit card only fine traffic rule police
Pune : विद्यार्थ्यांनाच राजदूत बनण्याची संधी! नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण; महाविद्यालयातून होणार तिघांची निवड

वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करताना वाहनचालक आणि पोलिस यांच्यात काही वेळा वाद होतात. तसेच, आरोपही केले जातात. वाहतूक पोलिस अंमलदार दंडाची रक्कम ही रोख स्वरुपात घेत नाहीत. दंडाची रक्कम डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारेच स्वीकारली जाते. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे.

- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा

No Parking Penalty amount will accepted through debit credit card only fine traffic rule police
Pune : दौंड बाजार समितीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा

वाहतूक नियम पहिल्यांदा आकारण्यात येणारी दंडाची रक्कम दुसऱ्यांदा आकारण्यात येणारी दंडाची रक्कम

वाहन प्रकार -दुचाकी - चारचाकी - दुचाकी - चारचाकी

  • नो पार्किंग - ५०० रुपये - ५०० रुपये - १५०० रुपये - १५००

  • टोइंग चार्ज - २०० - ४८४ - २०० - ४८४

  • जीएसटी - ८५.५६- ८७.१२- ८५.५६ - ८७.१२

  • एकूण (रुपयांत) ७८५.५६ - १०७१.१२ - १७८५.५६ - २०७१.१२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com