IND vs PAK Delhi Police esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK : जरा चेक करा... NYPD ला टॅग करत दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानचा काढला चिमटा

T20 World Cup 2024 : पाकिस्तानला 120 चेंडूत 120 धावा करता न आल्यानं त्यांच्यावर टीका होत आहे. याचबरोबर ते चेष्टेचा विषय देखील ठरले आहेत.

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Pakistan T20 World Cup 2024 : 9 जूनला न्यूयॉर्कच्या नासाऊ स्टेडियमवर टी 20 वर्ल्डकप 2024 मधील ग्रुप A मधील सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पारभव केला. प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या भारताने 119 धावाच केल्या होत्या. पाकिस्तानने पहिल्यांदाच टी 20 क्रिकेटमध्ये भारताचा ऑल आऊट केला होता. त्यावेळी भारत सामना हरतो की काय अशी स्थिती होती.

मात्र जसप्रीत बुमराह आणि भारताच्या इतर गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत 119 धावांचे टार्गेट देखील डिफेंड केले. जसप्रीत बुमराहने 4 षटकात 14 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पांड्याने 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. पाकिस्तानला 20 षटकात 7 बाद 113 धावांपर्यंतच मजल मारता आली.

दरम्यान, भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी एक भन्नाट ट्विट केलं. त्यांनी एनवायपीडीला टॅग करत पाकिस्तानची चांगलीच खेचली.

पाकिस्तानच्या पराभवानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट शेअर केलं. त्यांनी न्यूयॉर्क पोलिसांना टॅग करत लिहिलं की, 'आम्ही दोन जोरदार आवाज ऐकले आहेत. एक इंडिया... इंडिया... चा आवाज आणि दुसरा टेलिव्हिजन फुटण्याचा आवाज. तुम्ही या गोष्टीची खातरजमा करू शकता का?'

दिल्ली पोलीस हे वरचेवर खोचक ट्विट करत असतात. त्यांचे अनेक ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताकडून तीनच फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. यात ऋषभ पंतने 31 चेंडूत 42 धावांची खेळी केली. त्यात 6 चौकारांचा समावेश होता. त्याला साथ देणाऱ्या अक्षर पटेलने 20 धावांचे योगदान दिलं. तर सलामीवीर रोहित शर्माने 12 चेंडूत 13 धावा केल्या.

पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हारिक राऊफने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद आमिरने 2 विकेट्स घेत भारतीय फंलदाजीला खिंडार पाडलं. शाहीनने रोहित शर्माची महत्वाची विकेट घेतली.

पाकिस्तानने फालंदाजी करताना 10 षटकात 2 बाद 57 धावा केल्या. त्यांची ही चांगली सुरूवात पाहून भारतीय संघाने सामना गमावला असं वाटलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी पुढच्या 10 षटकात पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या. त्यांनी ठराविक अंतराने विकेट्स घेत पाकिस्तानवर दबाव वाढला. यामुळं चेंडू आणि धावा याच्यातील अंतर वाढत गेलं.

अखेर भारताने पाकिस्तानला 20 षटकात 7 बाद 113 धावांपर्यंत रोखलं. जसप्रीत बुमराहने 3 तर हार्दिक पांड्याने 2 विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत आपली भुमिका चोख बजावली. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 31 धावा केल्या.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : मयूर रथातून दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक; रंगीबेरंगी फुलांनी सजला रथ; सकाळी ८ वाजता मुख्य मंदिरातून मिरवणुकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT