IND vs PAK : त्यानं मुद्दाम बॉल वाया घालवले... पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं कोणावर केला गंभीर आरोप?

T2O World Cup 2024 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर आता पाकिस्तानात ब्लेम गेम सुरू झाला आहे.
Imad Wasim
T20 World Cup 2024esakal

T20 World Cup 2024 : भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव करत टी 20 वर्ल्डकप 2024 मधील पाकिस्तानचं आव्हान संपवलं. भारताने पाकिस्तानसमोर फक्त 120 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र 10 षटकात 2 बाद 57 धावा करूनही पाकिस्तानला 20 षटकात हे आव्हान पार करता आलं नाही.

सामना झाल्यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलिम मलिकने पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इमाद वासिमवर गंभीर आरोप केले. इमाद वासिमने बॉल मुद्दाम वाया घालवल्यामुळं पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव झाला असा आरोप सलिम यांनी केला. इमाद वासिमने 23 चेंडू खेळून 15 धावा केल्या होत्या.

Imad Wasim
IND vs PAK : पुढचा भारत - पाक सामना होणार लाहोरमध्ये? CT बाबत पीसीबीने दिली मोठी अपडेट 

सलिम यांनी 24 न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं की, 'तुम्ही त्याची इनिंग पाहू शकता. असं दिसतंय की तो बॉल वाय घालवतोय आणि पाकिस्तानचा रन चेस अवघड करतोय.'

पाकिस्तानचा अजून एक माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही व्यवस्थित नसल्याचं जावणवतय असं सांगितलं. काही खेळाडू आणि बाबर आझम यांच्यात वाद आहेत.

Imad Wasim
Ind vs Pak : 'आमची रणनीती सोपी होती पण...' भारताविरुद्ध पराभवानंतर कर्णधार बाबरने सांगितली कुठे झाली चुक?

आफ्रिदी म्हणाला की, 'कर्णधार सर्व संघाला एकत्र ठेवत असतो. तो संघातील वातावरण बिघडवतो किंवा तो संघाची उभारणी करतो. वर्ल्डकप संपल्यानंतर मी याबाबत स्पष्टपणे बोलणार आहे.'

'माझं आणि शाहीन आफ्रिदीचं नातं असल्यानं जर मी बोललो तर लोकं मला जावयाच्या हितासाठी बोलतो असं म्हणतील.'

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com