Rohit Sharma - Shubman Gill Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Shubman Gill Post: रोहित शर्माशी खरंच बिनसलं? गिलने 'ती' पोस्ट करत चर्चा करणाऱ्यांची घेतली शाळा

Rohit Sharma - Shubman Gill: गेल्या दोन दिवसापासून शुभमन गिल आणि भारतीय संघात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यानंतर आता गिलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Pranali Kodre

Shubman Gill Social Media Post: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडीज येथे चालू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे पहिल्या फेरीतील सामने संपल्यानंतर राखीव खेळाडू असलेल्या शुभमन गिल आणि आवेश खान यांना मायदेशी पाठवल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर शुभमन गिल आणि भारतीय संघात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या चर्चांदरम्यानच आता गिलने इंस्टाग्राम स्टोरीला एक पोस्ट शेअर करत या चर्चांना जवळपास पूर्णविराम लावला आहे.

गिलने रविवारी इंस्टाग्राम स्टोरीवर जी पोस्ट केली आहे, त्यात त्याने भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची मुलगी समायरा यांच्याबरोबरचा फोटो शेअर केले आहेत. तसेच त्या फोटोला कॅप्शन दिले आहे की 'सॅमी आणि मी रोहित शर्माकडून शिस्तीची कला शिकत आहे.'

खरंतर त्याच्या या गुढ कॅप्शनमागे गेल्या दोन दिवसापासून त्याच्याबद्दल होणाऱ्या चर्चा हे कारण आहे.

Rohit Sharma - Shubman Gill

काय होत होत्या चर्चा

खरंतर शुभमन गिलची टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवड झाली नव्हती, पण तो राखीव खेळाडू म्हणून टीम इंडिया सोबत युएसएला गेला होता. मात्र त्याला आणि आवेश खानला मायदेशी पाठवण्यात आल्यानंतर मात्र विविध चर्चांना उधाण आलं.

टी20 वर्ल्ड कपमधील भारताच्या सामन्यांसाठी राखीवमधील खेळाडू रिंकू सिंह, आवेश खान आणि खलील अहमद हे स्टँडमध्ये दिसले होते, मात्र या सर्वांमध्ये शुभमन गिल कुठेही दिसला नव्हता. याचदरम्यान आता त्याला आणि आवेशला मायदेशी पाठल्यानं त्यामागील कारण नक्की काय अशी चर्चा सुरू झाली.

काही मिडिया रिपोर्ट्सनुसार गिलला मायदेशी पाठवण्यामागे शिस्तभंग हे कारण होतं. तो भारतीय संघापासून वेगळं राहत होता. मात्र शनिवारी आलेल्या आणखी एका रिपोर्टनुसार गिलला मायदेशी पाठवण्यामागे शिस्तभंगाचे कारण नाही.

तसेच यापूर्वी क्रिकबझनेही दिलेल्या वृत्तानुसार पहिल्या फेरीत दुखापतींसाठी खबरदारी म्हणून हे दोघेही टीम इंडियाबरोबर होते. कारण जर संघातील एखाद्या खेळाडूला दुखापत झाली असती, तर त्यांना त्वरित अमेरिकेत पाठवणे कठीण झाले असते.

त्यामुळे या दोघांनाही 14 जून किंवा 15 जून पर्यंत संघासह थांबण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर आता ते दोघे पुन्हा भारतात परतले आहेत.

पण याच दरम्यान आता असेही रिपोर्ट समोर आले की गिलने रोहित शर्माला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. यावरूनच रोहित शर्मा, भारतीय संघ आणि शुभमन गिल याच्यात सर्व काही ठिक नसल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र, आता गिलनेच पोस्ट करत या चर्चा फक्त अफवा असल्याचे सुचवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजचा अंतिम टी-२० सामना कुठे अन् कधी पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

Marathwada Graduates Constituency Election : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत रंगत! नेत्यांचे फोटो दोन्ही उमेदवारांच्या प्रचार बॅनरवर; मतदार संभ्रमात!

Parli Vaijnath News : आमदार धनंजय मुंडे यांनी परळीत देवीचे दर्शन घेतले, आपल्या हाताने खिचडी प्रसाद बनवला आणि भाविकांना वाटला ही....

Marathi News Live Updates: गोरेगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना; १० वर्षांच्या मुलीने १८ महिन्यांच्या चिमुरडीला ६ व्या मजल्यावरून फेकले

Death Penalty: मेरठ कोर्टाचा ऐतिहासिक निकाल! पतीला साप चावल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीसह प्रियकराला फाशीची शिक्षा

SCROLL FOR NEXT