Shubman Gill : गिलनं रोहितला केलं अनफॉलो; शुभमनसह आवेश खान मायदेशात परतणार, टीम इंडियात चाललंय तरी काय?

Shubman Gill T20 World Cup 2024 : टीम इंडियात सर्व काही सुरळीत नाही अशी माहिती मिळत आहे. गिल अन् रोहितमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.
Shubman Gill
Shubman Gill T20 World Cup 2024 esakal

Shubman Gill Controversy : भारताचा सलामीवीर शुभमन गिल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. युएसए आणि वेस्ट इंडीज येथे सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात त्याची निवड झाली नव्हती. तो स्टँड बाय खेळाडू म्हणून टीम इंडिया सोबत युएसएला गेला होता. मात्र आता त्याला आणि आवेश खानला मायदेशी पाठवण्यात आलं आहे.

भारतीय संघ युएसएमध्ये खेळत होता त्यावेळी स्टँड बाय मधील खेळाडू रिंकू सिंह, आवेश खान आणि खलील अहमद हे स्टँडमध्ये येऊन टीमचा उत्साह वाढवत होते. मात्र या सर्वांमध्ये शुभमन गिल कुठं दिसला नव्हता.

Shubman Gill
T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानचा संघ पोहचला सुपर 8 मध्ये; आता भारताला देणार आव्हान

दरम्यान, भारताने ग्रुप स्टेजमधील आपले तीन सामने खेळल्यानंतर आता शुभमन गिल आणि आवेश खान यांना मायदेशात परतण्यास सांगितलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला मायदेशी पाठवण्याचे खरं कारण हे शिस्तभंग आहे. अमेरिकेत शुभमन गिल हा संघासोबत दिसलाच नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार गिल संघापासून वेगळं राहत होता. तो आपला साईड बिजनेस करण्यात व्यग्र होता.

शुभमनने रोहितला इन्स्टावर केलं अनफॉलो

या संपूर्ण प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला. शुभमन गिलने भारताचा कर्णधार रोहित शर्माला इन्स्टाग्रावर अनफॉलो केलं आहे. यावरून असं दिसतंय की टीम इंडिया आणि शुभमन गिल याच्यात सर्व काही ठिक नाहीये.

शुभमन गिलने गेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारताकडून चांगली कामगिरी केली होती. मात्र त्याला टी 20 वर्ल्डकप संघात स्थान मिळालं नाही. आता रोहित आणि शुभमन गिलमधील दुराव्याच्या बातम्या खऱ्या की खोट्या हे येणारा काळच सांगेल.

Shubman Gill
Euro Cup 2024 : जर्सी नंबर 10, युरो कपमधला मेस्सी! जर्मनीच्या मुसिआलाचा जादुई गोल; Video व्हायरल

शुभमन गिलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

शुभमन गिलने आतापर्यंत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये 25 कसोटी, 44 वनडे आणि 14 टी 20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 1492, वनडेमध्ये 2271 तर टी 20 मध्ये 335 धावा आहेत.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com