India | Australia Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup मधील सुपर-8 आहे तरी काय, भारत-ऑस्ट्रेलिया एकाच गटात कसे? जाणून घ्या सर्व काही

Super Eight Explainer: टी20 वर्ल्ड कपमधील सुपर-8 मधील दोन ग्रुप कसे पडले, काय आहे स्वरूप, याचा घेतलेला आढावा.

Pranali Kodre

T20 World Cup Super Eight Explainer: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा आता मध्यावर आली असून पहिली फेरी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आता सर्वांना सुपर-8 फेरीची उत्सुकता लागली आहे. सुपर-8 मध्ये प्रवेश करणारे 7 संघ निश्चित झाले आहेत, आता अखेरचा संघ सोमवारी (17 जून) निश्चित होईल.

दरम्यान, सुपर-8 फेरीला 19 जूनपासून सुरुवात होत आहे. यासाठी 8 संघांचे दोन गट करण्यात आले आहेत. पण हे गट कसे पडले, सुपर-8 फेरीचे स्वरुप काय आहे, याबद्दल माहिती आहे का? आता याबद्दलच जाणून घेऊ.

सुपर-8 मध्ये कोणत्या संघांचा प्रवेश

टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी झाले आहेत. या 20 संघांचे पहिल्या फेरीसाठी अ, ब, क, ड असे 4 गट करण्यात आले होते. या चार गटात साखळी सामने खेळवण्यात आले.

साखळी सामन्यांनंतर चारही गटातून प्रत्येकी दोन अव्वल संघ सुपर-8 फेरीसाठी पात्र ठरतील. यानुसार एकूण १२ संघांचे आव्हान पहिल्या फेरीनंतर संपेल.

सुपर-8 मध्ये प्रवेश केलेल्या आठ संघांचीही दोन ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक संघ प्रत्येकी 3 सामने सुपर-8 मध्ये खेळणार आहे. यातून दोन्ही ग्रुपमधून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

सुपर-8 फेरीची गटवारी कशी ठरली?

सुपर-8 फेरीसाठी दोन गट आयसीसीने जाहीर केले आहेत. यानुसार पहिल्या गटात भारत (अ-1), अफगाणिस्तान (क-1), ऑस्ट्रेलिया (ब-2), बांगलादेश/नेदरलँड्स (ड-2) या संघांचा समावेश आहे. तसेच दुसऱ्या गटामध्ये अमेरिका (अ-1), दक्षिण आफ्रिका (ड-1), वेस्ट इंडिज (क-2), इंग्लंड (ब-1) या संघांचा समावेश आहे.

आता हे गट कसे पाडण्यात आले हे माहित आहे का, तर खरंतर स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अव्वल 8 संघांना मानांकन देण्यात आले होते. जसे टेनिस-बॅडमिंटन यांसारख्या खेळांमध्ये साधारणत: आपण पाहातो. म्हणजे जागतिक क्रमवारीनुसार मानंकन दिले जाते. त्याचनुसार आयसीसी टी20 संघ क्रमवारीनुसार अव्वल 8 संघांना मानांकन देण्यात आले होते.

असे मानांकन देण्यामागचं साधारण कारण म्हणजे एकतर सुपर-8 मध्ये कोणते संघ प्रवेश करतील, याचा आधीच ढोबळ अंदाज घेतलेला असतो. ज्यामुळे सुपर-8 मध्ये कसे सामने येतील आणि चाहत्यांचे मनोरंजन होऊ शकेल, हे लक्षात येते. यानुसार स्पर्धा अधिक रोमांचक कशी होऊ शकेल, याच्या योजना तयार होऊ शकतात.

याचनुसार पहिल्या फेरीपूर्वी चारही गटातील प्रत्येकी 2 संघांना असे मिळून एकूण 8 संघांना आयीसीसी क्रमवारीनुसार मानांकन देण्यात आले होते.

त्यामुळे त्या मानांकनानुसार सुपर-8 फेरीतील दोन गटांची विभागणी आधीच झालेली होती. म्हणजे पहिल्या गटामध्ये अ-1, ब-2, क-1, ड-2, तर दुसऱ्या गटात अ-2, ब-1, क-2, ड-1 हे संघ असतील.

असे होते मानंकन -

  • अ गट - भारत (अ-1), पाकिस्तान (अ-2)

  • ब गट - इंग्लंड (ब-1), ऑस्ट्रेलिया (ब-2)

  • क गट - न्युझीलंड (क-1), वेस्ट इंडिज (क-2)

  • ड गट - दक्षिण आफ्रिका (ड-1), श्रीलंका (ड-2)

आता अनेकांना प्रश्न पडला असेल की जर मानांकन आधीच दिले आहेत, तर मग मानांकन मिळालेले जे संघ पहिल्याच फेरीतून बाहेर पडले आहेत, त्यांचे काय. तर नियमानुसार मानांकन मिळालेले जे संघ त्यांच्या गटातून सुपर-8 साठी पात्र ठरले नाहीत, त्यांच्या जागेवर जे संघ पात्र ठरलेत त्यांना ती जागा मिळते.

म्हणजेच आता क गटातून न्यूझीलंड बाहेर पडले आहेत. त्यांच्या जागेवर अफगाणिस्तानने सुपर-8 मध्ये जागा मिळवली आहे. त्यामुळे क-1 ही जागा अफगाणिस्तानला मिळेल, तर वेस्ट इंडिजला क-2 असे मानांकन आधीच आहे.

त्याचनुसार अ गटातून पाकिस्तान बाहेर पडल्याने, त्यांची अ-2 ची जागा अमेरिकेला मिळाली, तर अ-1 म्हणून आधीच भारताला मानांकन मिळालेले होते.

या नियमानुसार पहिल्या फेरीत मानांकन मिळालेल्या संघाने अव्वल क्रमांक मिळवला किंवा दुसरा तरी फारसा फरक पडला नसता.

कारण त्यांनी गटात पहिल्या दोन पैकी कोणताही क्रमांक मिळवला असता, तरी त्यांची गटवारी त्यांना आधीच मानांकन मिळालेले असल्याने आधीच ठरलेली असती. उदाहरण द्यायचे झाले, तर भारतीय संघ अ गटात दुसऱ्या क्रमांकावर असते, तरी त्यांचे मानांकन अ-1 असल्याने ते सुपर-8 फेरीत पहिल्याच गटात असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike : दूध महागणार! १ सप्टेंबरपासून प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ; नवा दर किती?

Devdutta Padikkal Tattoo: बाबो! जर्सीचा नंबर अन् नाव थेट पाठीवर! पडिक्कलच्या टॅटू पाहून चाहतेही चक्रावले, म्हणाले, ‘ अरे हे काय!’

Animal Feed Poisoning: पशुखाद्यातून विषबाधा; गोणेवाडीत दोन जनावरे दगावली, दोन गंभीर; पशुपालकाला मोठा आर्थिक फटका

Marathi News Live Updates : तिबेटच्या बाजूने पुन्हा जलधरण फुटल्याची माहिती; नेपाळ पोलिसांकडून हाय अलर्ट

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात माणुसकीला लाज आणणारी घटना! मृत महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने चोरले; VIDEO VIRAL होताच संतापाची लाट

SCROLL FOR NEXT