T20 World Cup Retire Out : टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच असा आऊट झाला खेळाडू, जाणून घ्या काय आहे नियम?

ENG vs NAM Namibia Nikolaas Davin : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये शनिवारी रात्री इंग्लंड आणि नामिबिया यांच्यात सामना खेळला गेला. पावसामुळे हा सामना 10-10 षटकांचा झाला आणि यामध्ये इंग्लंडने 41 धावांनी विजय मिळवला.
ENG vs NAM Namibia Nikolaas Davin
ENG vs NAM Namibia Nikolaas Davinsakal

ENG vs NAM T20 World Cup Nikolaas Davin Retire Out : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये शनिवारी रात्री इंग्लंड आणि नामिबिया यांच्यात सामना खेळला गेला. पावसामुळे हा सामना 10-10 षटकांचा झाला आणि यामध्ये इंग्लंडने 41 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकांत 5 गडी गमावून 122 धावा केल्या. प्रत्युत्तरात नामिबियाचा संघ तीन गडी गमावून केवळ 84 धावा करू शकला. अशाप्रकारे डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडने हा सामना 41 धावांनी जिंकला.

या सामन्यात नामिबियाचा स्टार फलंदाज निकोलस डेव्हिन रिटायर्ड आऊट झाला. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा फलंदाज अशा प्रकारे आऊट झाला आहे. चला जाणून घेऊया काय आहे रिटायर्ड आऊटचा हा नियम?

ENG vs NAM Namibia Nikolaas Davin
T20 WC 24 Super 8 : सुपर-8ची शर्यत रोमांच मोडवर! 20 पैकी 11 संघांचा पत्ता कट; आता एका जागेसाठी दोन टीममध्ये टक्कर

10 षटकांत 123 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मायकल लिंगेनने नामिबियाला चांगली सुरुवात करून दिली. त्याचवेळी दुसऱ्या टोकाला असलेला निकोलस डेव्हलिन त्याच्या शैलीत फलंदाजी करत नव्हता. सहाव्या षटकात डेव्हिन 16 चेंडूत 18 धावा काढून खेळत होता. यामुळे त्यांनी रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याच्या जागी डेव्हिड विस क्रीझवर आला. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडू रिटायर्ड आऊट होण्याची वेळ आली आहे.

ENG vs NAM Namibia Nikolaas Davin
T20 World Cup 2024 Super 8 : स्कॉटलंडचे स्वप्न भंगले! ऑस्ट्रेलियाच्या विजयाची साहेबांच्या ताफ्यात पार्टी; इंग्लंडला मिळाले सुपर-8चे तिकीट

रिटायर्ड आऊट होण्याचा काय आहे नियम?

खरं तर, एमसीसी नियम 25.4.3 नुसार, जेव्हा फलंदाज 25.4.2 (आजार, दुखापत किंवा इतर कोणत्याही अपरिहार्य कारणास्तव) व्यतिरिक्त इतर कारणास्तव मैदान सोडले तर खेळाडू फक्त तेव्हाच फलंदाजीसाठी परत येऊ शकतो, जेव्हा विरोधी कर्णधार परवानगी देतो. जर कोणत्याही कारणास्तव फलंदाज पुन्हा खेळण्यासाठी आला नाही तर फलंदाज ‘रिटायर्ड आऊट’ म्हणून समजला जातो.

दुसरीकडे, जेव्हा एखाद्या खेळाडूला पंचाकडून रिटायर्ड हर्ट दिला जातो तेव्हा तो पुन्हा फलंदाजी करू शकतो. यासाठी त्याला विरोधी संघाच्या कर्णधाराच्या संमतीची गरज नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com