Team India Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC Super-8 Schedule: टीम इंडियाचे पहिल्या फेरीतील सामने संपले, आता सुरू होणार सुपर-8चे आव्हान; जाणून संपूर्ण शेड्युल

Team India Super-8 Schedule: भारतीय संघाने टी20 वर्ल्डकपच्या सुपर-8 फेरीत प्रवेश केला असून आता या फेरीत कोणत्या संघाविरुद्ध सामने होणार आहेत, जाणून घ्या.

Pranali Kodre

Team India Super-8 Schedule: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील भारतीय संघाचा पहिल्या फेरीतील अखेरचा सामना कॅनडाविरुद्ध फ्लोरिडाला होणार होता. मात्र सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राऊंडवर होणारा हा सामना पावसामुळे मैदान ओले असल्याने रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आला आहे.

या सामन्यासह कॅनडाचा या स्पर्धेतील प्रवास संपला आहे, तर भारतीय संघ आता सुपर-८ मधील सामना खेळेल. भारताचे सुपर-८ मधील तिन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता चालू होणार आहेत. भारतीय संघ पहिल्या फेरीत ग्रुप ए मध्ये होता.

भारतासह अमेरिका, कॅनडा, आयर्लंड आणि पाकिस्तान हे संघही या ग्रुपमध्ये होते. या ग्रुपमधून भारताने ७ गुणांसह अव्वल क्रमांक मिळवला, तर अमेरिकेने ५ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला. त्यामुळे हे दोन संघ सुपर-८ फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

दरम्यान, यंदाच्या स्पर्धेत २० संघ सामील झाले होते. या २० संघांची चार ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर-८ फेरीत प्रवेश करणार होते. त्यामुळे सध्या ग्रुप ए आणि ग्रुप सी यांच्यातील दोन अव्वल संघ निश्चित झाले आहेत.

ग्रुप सीमधून अव्वल क्रमांक अफगाणिस्तानने मिळवला आहे, तर दुसरा क्रमांक वेस्ट इंडिजने मिळवला आहे. याशिवाय ग्रुप बीमधून ऑस्ट्रेलियाने अव्वल क्रमांक निश्चित करत सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे , मात्र या ग्रुपमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी स्कॉटलंड आणि इंग्लंड यांच्यात शर्यत आहे.

तसेच ग्रुप डीमधून दक्षिण आफ्रिकेने अव्वल क्रमांक निश्चित करत सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. परंतु, दुसऱ्या क्रमांकासाठी बांग्लादेश आणि नेदरलँड्स यांच्यात स्पर्धा आहे.

आता टी२० वर्ल्ड कपच्या स्वरुपानुसार सुपर-८ मध्ये प्रवेश केलेल्या आठ संघांचीही दोन ग्रुपमध्ये विभागणी करण्यात येतील. त्यानुसार सामने प्रत्येक संघ प्रत्येकी ३ सामने सुपर-८ मध्ये खेळणार आहे. यातून दोन्ही ग्रुपमधून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

यानुसार सुपर-८ साठी पहिल्या ग्रुपमध्ये भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश/नेदरलँड्स या संघांचा समावेश आहे. तसेच दुसऱ्या ग्रुपमध्ये अमेरिका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड/स्कॉटलंड या संघांचा समावेश आहे.

भारताचे सुपर-८ फेरीचे वेळापत्रक (वेळ - भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता)

  • २० जून - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, बार्बाडोस

  • २२ जून - भारत विरुद्ध बांगलादेश/नेदरलँड्स, अँटिग्वा

  • २४ जून - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सेंट लुसिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! आज 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचा दर किती?

Viral Video : आरती सुरु असतानाच पुजाऱ्याला हृदयविकाराच्या झटका, जागेवरच मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Update : जयंत पाटील वर्षावर गेले, म्हणजे राजकारणात ट्विस्ट आहे; राष्ट्रवादीच्या नेत्याचं विधान

IND vs ENG 1st ODI: अक्षर पटेलची ऐतिहासिक कामगिरी! सचिन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, युवराज सिंगसह सहा जणांशी बरोबरी

Sangli Crocodile Attack : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! मगरीने आधी खांदा पकडला, मग मानेवर झडप; पाठीत दात घुसल्याने गंभीर जखमी, 60 वर्षीय नागरिकाची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT