Team India | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: आनंद गगनात मावेना! टीम इंडियाच्या विश्वविजयानंतर खेळाडूंचं भन्नाट सेलिब्रेशन, BCCI ने शेअर केला अनसीन Video

Team India Celebration: टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर खेळाडूंनी केलेल्या सेलिब्रेशनदरम्यानचे अनेक क्षण कैद केलेला एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

T20 World Cup 2024, India vs South Africa: भारताने दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामन्यात पराभव करून टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यासह भारताने 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी, 13 वर्षांनंतर वर्ल्ड कप आणि 17 वर्षांनंतर टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. स्वप्न साकार झाल्याची भावना आणि सर्वत्र निखळ आनंद, टीम इंडियाच्या अभिमानास्पद क्षणाचा मोंटेज.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद, गेल्या 11 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफी, गेल्या 13 वर्षांपासून कोणताही विश्वचषक जिंकला.

टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतीय संघाने विराट कोहलीच्या 76 धावांच्या जोरावर 176 धावा केल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर असताना त्यांना 30 चेंडूत 30 धावांची गरज होती. त्यावेळी भारताची विजयाची शक्यता फक्त 3 टक्के होती. पण अखेरीस हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने रोमांचक सामना जिंकला.

टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाने मैदानावर जोरदार आनंद साजरा केला. या सेलिब्रेशनदरम्यानचे अनेक क्षण कैद केलेला एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

या सामन्यात भारताने दिलेल्या 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 8 बाद 169 धाच करता आल्या.

दरम्यान, या सामन्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तसेच हा अंतिम सामना राहुल द्रविडचा भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून देखील अखेरचा सामना होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : पुण्यात जनता वसाहतीत कोयत्याने गाड्यांची तोडफोड; परिसरात दहशतीचे वातावरण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT