T20 World Cup: भारताच्या विश्वविजयाचीच सर्वत्र चर्चा! रोहित सर्वात पॉप्युलर खेळाडू, जाणून घ्या सोशल मीडियावर कोणी मारली बाजी?

Social Media Engagements during T20 World Cup 2024: टी२० वर्ल्ड कप दरम्यान भारतीय संघाची आणि खेळाडूंची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
Virat Kohli | Rohit Sharma | T20 World Cup 2024
Virat Kohli | Rohit Sharma | T20 World Cup 2024Sakal

Social Media Engagements during T20 World Cup 2024: 29 जून 2024... ही तारीख भारतीय क्रिकेट इतिहासात नेहमीसाठी कोरली गेली आहे. याचदिवशी भारतीय क्रिकेट संघाने टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम गाजवला. बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभवाचा धक्का दिला.

भारताच्या या विजयाचे अनेक खेळाडू नायक ठरले. 76 धावांची खेळी करणारा विराट कोहली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तसेच या सामन्यात जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि आर्शदीप सिंग यांनी केलेली गोलंदाजीही महत्त्वाची ठरली. त्यामुळे भारताने 11 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयसीसी ट्रॉफी उंचावली.

या स्पर्धेत भारताने पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका अशा मोठ्या संघांना पराभूत केले. पण या स्पर्धेनंतर भारताचे तीन दिग्गज क्रिकेटपटू विराट, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

दरम्यान या स्पर्धेने भारतीय चाहत्यांना सेलिब्रेशनसाठी अनेक आनंदाचे क्षण दिले. त्यामुळे क्रिकेट हा गेल्या दोन महिन्यात चर्चेचा विषय ठरला होता. सोशल मीडियावरही याबाबत मोठ्याप्रमाणात चर्चा झाली. सोशल मीडियावरील या चर्चेचा Sprinklr च्या मदतीने सांख्यिकी माहिती मिळाली असून त्याचा घेतलेला हा आढावा.

Social Media  | T20 World Cup 2024
Social Media | T20 World Cup 2024

क्रिकेटबाबत चर्चा

मे महिन्याच्या अखेरीपासून ते 30 जून पर्यंत सोशल मीडियावर क्रिकेटबाबत 5.717 मिलियनहून अधिकवेळा चर्चा झाली. या कालावधीत 1.293 मिलियनहून अधिक एंगेजमेंट मिळाली. यातील बऱ्याच चर्चा या एक्सवर (ट्वीटर) आणि युट्युबवर घडल्या. या दोन माध्यमांवर क्रिकेट चाहते अधिक सक्रिय आहेत.

या दोन माध्यमांसह इंस्टाग्राम, रेडिट, फेसबुक आणि न्यूज आऊटलेट असे एकूण मिळून क्रिकेटबाबात तब्बल 486.67 बिलियनपेक्षा अधिक व्ह्युज आले आहेत. यातील 89.41 टक्के चर्चा सकारात्मक होती.

दरम्यान भारत हा क्रिकेटवेडा देश समजला जात असल्याने सर्वाधिक क्रिकेटची चर्चा भारतात होणे, सहाजिकच आहे. त्यामुळे वर्ल्डकपच्या कालावधीत भारतातून सोशल मीडियावर क्रिकेटबद्दल 1 मिलियनपेक्षा अधिक बोलले गेले.

Social Media  | T20 World Cup 2024
Social Media | T20 World Cup 2024
Social Media  | T20 World Cup 2024
Social Media | T20 World Cup 2024

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका नवी रायव्हलरी

इतकेच नाही, तर क्रिकेटविश्वात आत्तापर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या रायव्हलरीबद्दल नेहमीच चर्चा होत असते, पण या टी20 वर्ल्ड कपमधून आता नवी रायव्हलरी समोर आली, ती म्हणजे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका.

अंतिम सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने भारताला संघर्ष करायला लावला होता. भारताने दिलेल्या 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हेन्रिक क्लासेनच्या आक्रमणामुळे भारतावरील दबाव वाढला होता. मात्र अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजांनी पुनरागमन करून देत भारताला सामना जिंकून देण्यात मदत केली.

दक्षिण आफ्रिकेला नंतर 20 षटकात 8 बाद 169 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताच्या विजयाला जगभरातून सोशल मीडियावर 1,54,997 अधिक मेन्शन करण्यात आले आणि त्यासाठी 24,480,256 इतकी एंगेजमेंट आली.

Social Media  | T20 World Cup 2024
Social Media | T20 World Cup 2024

पॉप्युलर खेळाडू

अंतिम सामन्याच्या दिवशी रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या सर्वात पॉप्युलर खेळाडूही ठरले. त्यातही सर्वाधिक चर्चा ही रोहित शर्माबद्दल झाली.

सोशल मीडियावर रोहित शर्माच्या चर्चांना 70,222,648 इतकी एंगेजमेंट आली, तर विराट कोहलीबद्दलही 50 मिलियनहून अधिक एंगेजमेंट आली. याशिवाय विराट, रोहित, जडेजाने निवृत्ती घेतल्याने त्याबद्दलही सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात बोलले गेले.

Social Media  | T20 World Cup 2024
Social Media | T20 World Cup 2024

पॉप्युलर संघ

यंदाच्या टी२० वर्ल्ड कपमध्ये २० संघ सहभागी झाले होते. यामध्ये अनेक संघांनी आपल्या कामगिरीने सर्वांना चकीत केले. यामध्ये अमेरिका आणि ओमान संघाचाही समावेश आहे. त्यामुळे टॉप ५ पॉप्युलर संघांमध्येही या दोन संघांचाही समावेश आहे.

Social Media  | T20 World Cup 2024
Social Media | T20 World Cup 2024

पॉप्युलर संघांमध्ये भारतीय संघ अव्वल क्रमांकावर आहे. भारतीय संघाला १ मिलियनहून अधिकवेळा मेन्शन करण्यात आले, तर त्याहून अधिक एंगेजमेंट मिळाली. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिका संघ आहे. तर या यादीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाचाही समावेश आहे.

इतकेच नाही, तर अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरनेही त्याच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. त्याच्याबाबत सोशल मीडियावर 51,000 पेक्षा अधिकवेळा चर्चा झाली.

Social Media  | T20 World Cup 2024
Social Media | T20 World Cup 2024

ब्रँड्सचीही चर्चा

वर्ल्ड कपदरम्यान व्हॉट्सऍपला सोशल मीडियावर सर्वाधिक 25 हजार मेन्शन आले आहेत. तसेच हॉटस्टारला 20 हजार, ड्रीम-11 ला 16 हजार आणि ऍमेझॉनला 13 हजार मेन्शन आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com