Hyderabad cricket chief offers big reward to players if they win Ranji Trophy Marathi News sakal
Cricket

Ranji Trophy : BMW अन् 1 कोटी... 'ही' ट्रॉफी जिंकणाऱ्या खेळाडूंना मिळणार बक्षीस! अध्यक्षांची मोठी घोषणा

रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात ग्रुप स्टेज सामने संपले आहे आणि बाद फेरीचे सामने लवकरच सुरू होतील.

Kiran Mahanavar

रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात ग्रुप स्टेज सामने संपले आहे आणि बाद फेरीचे सामने लवकरच सुरू होतील. प्लेट गटाच्या अंतिम सामन्यात हैदराबादने मेघालयचा 5 गडी राखून पराभव केला. तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघाकडून के नितेश रेड्डी आणि प्रज्ञा रेड्डी यांनी शतके झळकावली.

दरम्यान, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांनी एक मोठी घोषणा केली आहे. पुढील ३ वर्षात आपल्या संघाने रणजी ट्रॉफी जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला १ कोटी रुपये आणि बीएमडब्ल्यू कार देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे त्याने पुढील तीन वर्षात रणजी ट्रॉफी जिंकल्यावर संघातील प्रत्येक खेळाडूला एक कोटी रुपये रोख आणि एक बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून दिली जाईल. त्यांच्या या घोषणेची बातमी सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनाही या पोस्टमध्ये टॅग करण्यात आले आहे.

रणजी ट्रॉफीच्या येत्या हंगामात हैदराबादला ट्रॉफी जिंकण्याची संधी असेल, कारण या संघात अनेक खेळाडू असतील ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभवही आहे. या मोसमात संघाचे नेतृत्व करणाऱ्या तिलक वर्मानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात हैदराबादने दोनदा ट्रॉफी जिंकली आहे. संघाने 1937/38 मध्ये पहिले विजेतेपद जिंकले, त्यानंतर 1986/87 मध्ये हैदराबाद दुसऱ्यांदा चॅम्पियन बनले. त्याच वेळी, संघ 1942/43, 1964/65 आणि 1999/2000 मध्ये उपविजेता ठरला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayan Ahmed: एक सल्ला, नंतर 'तो' मॅसेज अन् सापळा... अयान अहमदनं तरुणींना जाळ्यात कसं ओढलं? पडद्यामागचा सल्लागार लव्हगुरू कोण?

Latest Marathi News Live Update: बदनापूरमध्ये पाणीटंचाईची दाहकता

KCC Campaign : पशुपालकांसाठी खुशखबर! 'किसान क्रेडिट कार्ड'वर मिळणार ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; राज्य शासनाची विशेष 'KCC' मोहीम

Cricket Viral Video: IPL काय बघताय? इथे तर पठ्ठ्याने मैदानावरच नांगर फिरवला; सामना थेट बंद! खेळाडू, रेफरी अन् प्रेक्षक हैराण

SRH vs CSK: चेन्नईच्या संघात मोठा बदल होणार! स्पर्धेतून बाहेर झालेल्या खलील अहमदची जागा घेण्यासाठी ४ खेळाडूंचे पर्याय

SCROLL FOR NEXT