IPL 2024 Schedule : 22 मार्चला चेन्नईत फुटणार आयपीएलचा नारळ, कधी होणार अंतिम सामना?

इंडियन प्रीमियर लीगचा सतरावा हंगाम कधी आणि केव्हा सुरू होणार यावर अनेक अटकळ बांधली जात होती पण ही स्पर्धा....
IPL 2024 Schedule Marathi News
IPL 2024 Schedule Marathi Newssakal

IPL 2024 Schedule Opening Ceremony : इंडियन प्रीमियर लीगचा सतरावा हंगाम कधी आणि केव्हा सुरू होणार यावर अनेक अटकळ बांधली जात होती. पण ही स्पर्धा 22 मार्चपासून ही सुरू होणार आहे, अशी आशा चाहत्यांना आहे.

आता चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) सीईओ काशी विश्वनाथन यांनीही याबाबत माहिती दिली आहे. तथापि, यापूर्वी आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमळ यांनीही 22 मार्चपासून स्पर्धा सुरू करण्याची योजना असल्याचे सांगितले होते. संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच यावरील पडदा हटणार आहे. पण काशी विश्वनाथन यांनी उद्घाटन सोहळ्याबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.

IPL 2024 Schedule Marathi News
NZ vs AUS : अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडवर ऑस्ट्रेलियाचा रोमहर्षक विजय! जाणून घ्या 20 व्या षटकांतील थरार

चेन्नईचे सीईओ कासी विश्वनाथन म्हणाले की, चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझी आपला पहिला सामना कुठे खेळेल आणि कोणाविरुद्ध खेळेल हे स्पष्ट नाही. क्रिकबझशी बोलताना ते म्हणाले की, आयपीएलने सामन्यापूर्वी उद्घाटन समारंभ आयोजित करण्याची योजना आखली आहे. आणि चेन्नई संघ गतविजेता आहे आणि त्यामुळेच या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे.

IPL 2024 Schedule Marathi News
Ind vs Eng : बुमराह बाहेर गेला पण टेन्शन वाढलं! आता 'ही' जबाबदारी रोहितसोबत कोणाच्या खांद्यावर?

अंतिम सामना कधी होणार?

आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी खेळला जाऊ शकतो, अशी माहितीही Cricbuzz ने आपल्या रिपोर्टमध्ये दिली आहे. मात्र, अद्याप पूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. लोकसभा निवडणुकीमुळे त्याचे वेळापत्रक दोन भागात येणार असल्याचे अध्यक्ष अरुण धुमळ यांनी सांगितले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या 15 दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीच्या तारखांनुसार पुढील वेळापत्रक ठरवले जाईल.

IPL 2024 Schedule Marathi News
Shubman Gill : वर्तमानकाळात जगणे महत्त्वाचे ; शुभमन गिल रांची सामन्याच्या दोन दिवस अगोदर पत्रकारांशी बोलताना

आयपीएल 2024 चे वेळापत्रक कधी जाहीर होणार?

आयपीएल 2024 च्या वेळापत्रक कधी येईल याची कोणतीही विशिष्ट तारीख अद्याप माहित नाही. पण बुधवारी रात्री अचानक सोशल मीडियावर एक खळबळ उडाली की गुरुवार 22 फेब्रुवारीला आयपीएलचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.

आयपीएलचे वेळापत्रक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता स्टार स्पोर्ट्स आणि जिओ सिनेमावर रिलीज होणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर दिसू लागल्या आहेत. यामध्ये पहिल्या 15 दिवसांचे वेळापत्रक जाहीर होणार असल्याचेही लोकांनी सांगितले. मात्र, याबाबत अधिकृत माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com