Ravichandran Ashwin  esakal
Cricket

Ravichandran Ashwin IND vs ENG : आता लोक काय म्हणतील याची भीती नाही... अश्विन 100 व्या कसोटीनंतर असं का म्हणाला?

Ravichandran Ashwin : अश्विनने दुसऱ्या डावात इंग्लंडचा निम्मा संघ गारद करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

अनिरुद्ध संकपाळ

Ravichandran Ashwin : भारताचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने इंग्लंविरूद्धच्या पाचव्या कसोटीत दमदार कामगिरी केली. आपली 100 वी कसोटी खेळणाऱ्या अश्विनने सामन्यात 9 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात त्याने 4 बळी टिपले होते.

तर दुसऱ्या डावात इंग्लंडचा निम्मा संघ गारद करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने इंग्लंडविरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत तब्बल 26 विकेट्स घेतल्या आहेत.

या कामगिरीनंतर अश्विनने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, 'संपूर्ण मालिकेत मी वेगवेगळ्या शैलीने आणि वेगवेगळ्या वेगाने चेंडू टाकला. भारत हा वैविध्यपूर्ण आहे त्यामुळे प्रत्येक मैदानावर वेगळं आव्हान असतं. लोकांना माझ्याबद्दल काय वाटतं याचा आता मला फार फरक पडत नाही.'

तो पुढे म्हणाला की, 'मला विश्वास आहे की मी काही ना काही नवीन आजमावून पाहत आहे. मी त्याबाबतीत मागे हटणार नाही. मी चांगल्या फिडबॅकसाठी माझे कान आणि डोळे सतत उघडे ठेवतो. जोपर्यंत मी नव्या गोष्टी आजमावून पाहणार नाही तोपर्यंत मी शिकणार नाही. एकाच शैलीला चिकटून राहणं काम करत नाही अस मी म्हणणार नाही. मात्र माझ्यासाठी प्रयोग करणं आणि शिकणं कायम फायदेशीर ठरलं आहे.'

अश्विनने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या डावात 77 धावात 5 विकेट्स घेतल्या. याचबरोबर त्याने रांची कसोटीत देखील दुसऱ्या डावात 51 धावात 5 विकेट्स घेतल्या होत्या.

अश्विनच्या मते रांची कसोटीतील दुसला स्पेल त्याला जास्त आनंद देऊन गेला. त्याला रांची कसोटीत ओली पोपची घेलेली विकेट सर्वात जास्त भावली.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: गर्भवती असतानाही Mains दिली; 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिली अन् थेट DSP झाली!

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

जरागेंच्या उपोषणाचा १० वा दिवस, प्रकृती खालावल्यानं मराठा बांधवांचा सरकारला इशारा | Jarange Patil

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

SCROLL FOR NEXT