Shreyanka Patil RCB vs DC WPL 2024 Final Marathi News 
Cricket

RCB vs DC : 21 वर्षीय श्रेयंका पाटीलने रचला इतिहास! WPL च्या फायनलमध्ये अशी कामगिरी करणारी पहिली बनली खेळाडू

Shreyanka Patil RCB vs DC WPL 2024 Final :

Kiran Mahanavar

RCB vs DC WPL 2024 Final : महिला प्रीमियर लीग 2024 चा अंतिम सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण दिल्ली कॅपिटल्सचा संघ आरसीबीच्या गोलंदाजांसमोर सपशेल फ्लॉप ठरला. कारण 18.3 षटकात दिल्लीचा संघ 113 धावांवर ऑलआऊट झाला. यादरम्यान आरसीबीच्या श्रेयंका पाटीलने ऐतिहासिक कामगिरी केली.

या सामन्यात 21 वर्षीय श्रेयंका पाटीलने अप्रतिम गोलंदाजी केली. आरसीबीसाठी ती सर्वात यशस्वी गोलंदाज होती. तिने 3.3 षटकात 12 धावा देत चार विकेट घेतल्या. यासह श्रेयंका पाटील महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात सर्वोत्तम स्पेल टाकणारी गोलंदाज ठरली. यापूर्वी हा विक्रम मुंबई इंडियन्सच्या हेली मॅथ्यूजच्या नावावर होता. हेली मॅथ्यूजने 2023 महिला प्रीमियर लीगमध्ये 4 षटकात 15 धावा देऊन 3 विकेट घेतल्या होत्या.

या सामन्यात श्रेयंका पाटील व्यतिरिक्त सोफी मोलिनेक्सही अप्रतिम गोलंदाजी केली. तिने 4 षटकात 20 धावा देत 3 बळी घेतले. विशेष बाब म्हणजे सोफी मोलिनेक्सने एकाच षटकात तिन्ही विकेट घेतल्या. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स वेगाने धावा करत होती. पण सोफी मोलिनेक्सने एका षटकात संपूर्ण खेळ बदलून टाकला.

या सामन्यात सलामीवीर शफाली वर्मा दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वात यशस्वी फलंदाज ठरली. शफाली वर्माने 27 चेंडूत 44 धावांची स्फोटक खेळी खेळली. यादरम्यान त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्यानंतर कर्णधार मेग लॅनिंगने 23 धावांचे योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT