T20 World Cup 2024 Marathi News sakal
Cricket

T20 World Cup 2024 : पाऊस अन् वादळानंतरही सामन्याचा निकाल लागणार! सेमीफायनल अन् फायनलसाठी ICC ची मोठी घोषणा

T20 World Cup 2024 : यंदाच्या जून महिन्यात टी-20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळली जाणार आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 : यंदाच्या जून महिन्यात टी-20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळली जाणार आहे. यावेळी चाहत्यांना वर्ल्ड कपमध्ये अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. कारण वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. इतक्या संघांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

क्रिकेटसारखा खेळ मोठा व्हावा यासाठी आयसीसी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान, आयसीसीने वर्ल्ड कपबाबत काही नवीन नियम जाहीर केले आहेत. ज्या अंतर्गत त्याने कोणत्या सामन्यांना राखीव दिवस असतील हे सांगितले आहे.

उपांत्य अन्‌ अंतिम लढतीसाठी राखीव दिवस

आयसीसीच्या बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या वर्षी जून महिन्यात वेस्ट इंडीज व अमेरिका येथे टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दोन लढती व अंतिम फेरीची एक लढत यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

तसेच साखळी व सुपर आठ फेरीच्या लढतींमध्ये दुसरा डाव फलंदाजी करीत असलेल्या संघाने किमान पाच षटके खेळणे अनिवार्य असणार आहे. पाच षटकांआधी पाऊस आल्यास ती लढत पूर्ण मानली जाणार नाही.

तसेच बाद फेरीच्या लढतींसाठी दुसरा डाव फलंदाजी करीत असलेल्या संघाने किमान दहा षटके फलंदाजी करायला हवी. त्यानंतरच लढतीचा निकाल लागू शकतो. पावसामुळे त्या दिवशी खेळ होऊ शकला नाही, तर मग ही लढत राखीव दिवसामध्ये खेळवण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT