WPL 2024 : 'मी आऊट झाल्यानंतर...' पराभवानंतर हरमनप्रीतने सांगितले कुठे झाली चूक

WPL 2023 Harmanpreet Kaur : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघावर पाच धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आणि पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली.
WPL 2023 Harmanpreet Kaur Marathi News
WPL 2023 Harmanpreet Kaur Marathi Newssakal

Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore WPL 2024 : एलिस पेरीची अष्टपैलू चमक (६६ धावा व १/२९) व श्रेयांका पाटील, सोफी मोलिनेयुक्स यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने शुक्रवारी येथे झालेल्या महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघावर पाच धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आणि पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली. आता जेतेपदाच्या लढतीत त्यांच्यासमोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असणार आहे. मुंबईचे आव्हान संपुष्टात आले.

WPL 2023 Harmanpreet Kaur Marathi News
ICC ची मोठी घोषणा... T20 वर्ल्ड कपपासून लागू होणार नवीन नियम! दोन ओव्हरमध्ये फक्त...

बंगळूरकडून मुंबई समोर १३६ धावांचे आव्हान उभे ठाकले होते. यास्तिका भाटीया (१९ धावा), हेली मॅथ्यूज (१५ धावा), नॅट सिव्हर (२३ धावा) यांनी आश्‍वासक सुरुवात केली, पण त्यांना मुंबईसाठी अव्वल दर्जाची खेळी करता आली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौर व अमेलिया केर या जोडीने मुंबईच्या विजयासाठी प्रयत्न केले, पण श्रेयांका पाटीलने हरमनप्रीतला ३३ धावांवर बाद केले आणि तेथूनच सामन्याला कलाटणी मिळाली. मुंबईला ६ बाद १३० धावांपर्यंतच मजल मारता आली.

WPL 2023 Harmanpreet Kaur Marathi News
Maharashtra Kabaddi Team : महाराष्ट्राच्या संघाची घोषणा! ठाण्याचा अस्लम इनामदार कर्णधारपदी नियुक्ती

अंतिम फेरीत पोहोचू न शकल्याने मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर खूप नाराज दिसली. पराभवानंतर हरमनप्रीत कौर म्हणाला की, शेवटच्या 12 चेंडूंमध्ये आम्हाला फक्त एका चौकाराची गरज होती. मात्र आम्ही तसे करण्यात यशस्वी होऊ शकलो नाही. ही या खेळाची खासियत आहे आणि दबावाखाली कसे खेळायचे ते शिकवते. मी आऊट झाल्यानंतर आमचे फलंदाज दडपणाखाली आले आणि हा या सामन्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला.

त्यापुढे हरमनप्रीत कौर म्हणाली की, हा हंगाम आमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेला होता. गेल्या हंगामात एक संघ म्हणून आमची कामगिरी खूप चांगली होती, पण या हंगामात आम्हाला खूप काही शिकण्याची संधी मिळाली आणि मला आशा आहे की पुढच्या वेळी आम्ही चांगल्या तयारीने मैदानात परतू.

WPL 2023 Harmanpreet Kaur Marathi News
Champions League Football : उपांत्यपूर्व फेरीच्या लढती निश्‍चित! रेयाल माद्रिद-मँचेस्टर सिटीमध्ये रंगणार सामना

बंगळूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या हेली मॅथ्यूज व नॅट सिव्हर ब्रंट या गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीसमोर बंगळूरच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. मॅथ्यूजने सोफी डिव्हाईनला १० धावांवर बाद करीत पहिला धक्का दिला. त्यानंतर नॅट सिव्हरने कर्णधार स्मृती मानधना हिला १० धावांवर बाद करीत बंगळूरचा पाय खोलात नेला. साईका इशाक हिने दिशा कसात हिला शून्यावरच बाद करीत मुंबईसाठी मोलाची कामगिरी बजावली.

बंगळूरची अवस्था चौथ्या षटकात ३ बाद २३ धावा अशी झाली. अशा विपरित परिस्थितीत एलिस पेरी हिने बंगळूरसाठी एकाकी झुंज दिली. तिने ५० चेंडूंमध्ये ८ चौकार व एक षटकारासह ६६ धावांची खेळी केली. २० व्या षटकात ती इशाकच्या गोलंदाजीवर बाद झाली. बंगळूरने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १३५ धावा फटकावल्या. मॅथ्यूजने १८ धावा देत दोन फलंदाज बाद केले. नॅट सिव्हरनेही १८ धावा देत दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. इशाकने २७ धावा देत दोन फलंदाजांना शिकार केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com