T20 World Cup 2024 Stop Clock Rule Marathi News sakal
Cricket

ICC ची मोठी घोषणा... T20 वर्ल्ड कपपासून लागू होणार नवीन नियम! दोन ओव्हरमध्ये फक्त...

T20 World Cup 2024 Stop Clock Rule : टी-२० व एकदिवसीय या क्रिकेटच्या दोन प्रकारांमध्ये आता वेळेचे बंधन कायमस्वरूपी असणार आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

T20 World Cup 2024 Stop Clock Rule : टी-२० व एकदिवसीय या क्रिकेटच्या दोन प्रकारांमध्ये आता वेळेचे बंधन कायमस्वरूपी असणार आहे. एक षटक संपल्यानंतर ६० सेकंद होण्याच्या आतमध्ये दुसरे षटक सुरू होणे अनिवार्य असणार आहे. जून महिन्यात सुरू होणाऱ्या टी-२० विश्‍वकरंडकापासून नवा नियम कायस्वरूपी लागू होणार आहे. आयसीसीच्या बैठकीत शुक्रवारी याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याआधी हा नियम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला होता.

आयसीसीकडून याबाबत स्पष्ट करण्यात आले की, डिसेंबर २०२३ पासून वेळेच्या बंधनाच्या नियमाला प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आली होती. या नियमाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला फायदा झाला. एकदिवसीय क्रिकेटच्या एका सामन्यात तब्बल २० मिनिटे वाचली. त्यामुळे आगामी टी-२० विश्‍वकरंडकापासून हा नियम आता कायमस्वरूपी करण्यात येणार आहे.

पाच धावांचा दंड

आयसीसीच्या नव्या नियमानुसार गोलंदाजी करीत असलेल्या संघाने षटक संपल्यानंतर ६० सेकंदांच्या आत दुसऱ्या षटकाला सुरुवात करायला हवी. पंचांकडून गोलंदाजी करीत असलेल्या संघाला दोन वेळा इशारा देण्यात येईल. एका डावामध्ये तीन वेळा ६० सेकंदांची मर्यादा ओलांडल्यास क्षेत्ररक्षण करीत असलेल्या संघाला पाच धावांचा दंड सुनावण्यात येणार आहे.

अशा घटनांसाठी सूट

आयसीसीकडून काही घटनांसाठी या नवीन नियमापासून सूट देण्यात आली आहे. नवा फलंदाज खेळपट्टीवर आल्यास, ड्रिंकसाठी ब्रेक घेतल्यास, खेळाडूला दुखापत झाल्यास अशा घटनांमध्ये वेळेचे बंधन ग्राह्य धरले जाणार नाही. आयसीसीकडून याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhadra Tiger Reserve Video : दुर्मिळ योगायोग! भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद; VIDEO तुफान व्हायरल

"मरणाच्या दारात असताना त्यांनी मला इंजेक्शन दिलं" दिव्या शिंदेचे बिग बॉस टीमवर गंभीर आरोप; म्हणाली..

PNB Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नेशनल बँकमध्ये ५,१३८ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update :धावत्या ट्रेनमधून वैतरणा नदीत पडला तरुण, सतर्कतेमुळे जीव वाचला

हॉटेलमध्ये चालवलं जायचं सेक्स रॅकेट, ५०० तरुणी, १०० ग्राहक; दलाल २० हजार घेऊन तरुणींना द्यायचे ५ हजार

SCROLL FOR NEXT