MS Dhoni CSK
MS Dhoni CSKesakal

IPL 2024 MS Dhoni CSK : तर हे धोनीच्या निवृत्तीचं कारण ठरेल... माजी खेळाडूने धोनीबाबत दिले मोठे संकेत?

IPL 2024 MS Dhoni CSK : महेंद्रसिंह धोनी सीएसकेकडून यंदाच्या हंगामात खेळतोय मात्र सीएसकेच्याच माजी खेळाडूने धोनीच्या भविष्याबाबत मोठे संकेत दिले आहेत.

IPL 2024 MS Dhoni CSK Wicket Keeping : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2024 च्या हंगामासाठी जय्यत तयारी करत आहे. त्याने आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी आधीच सरावाला सुरूवात केली होती. तो गेल्या हंगामात गुडघ्याच्या दुखापतीमुळे पुढचा हंगाम खेळले की नाही अशी चिंता चाहत्यांना लागून राहिली होती. मात्र धोनी फिट झाला असून तो मैदानावर उतरणार आहे.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाने जिओ सिनेमाच्या लेजंड्स लाऊंज कार्यक्रमात धोनीबाबत वेगळेच संकेत दिले. धोनीबद्दल बोलताना उथप्पा म्हणाला की, 'चेन्नई धोनीला तो व्हील चेअरवर असला तरी खेळवेल. बॅटिंग करताना व्हिल चेअरवरून उतर बॅटिंग कर आणि पुन्हा व्हिलचेअरवर बस.'

MS Dhoni CSK
Ranji Trophy 2024 Final : भावाने सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड मोडताच सर्फराज म्हणाला शेर भुका हैं!

उथप्पाला विश्वास आहे की धोनी सीएसकेसाठी फलंदाजीत अजून चांगले योगदान देऊ शकतो. फलंदाज म्हणून सीएसके देखील त्याला खेळवण्यासाठी काहीही करेल. मात्र धोनीच्या विकेटकिपिंगबाबत उथप्पा थोडा साशंक आहे. कारण धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.

उथप्पा म्हणाला की, 'धोनीसाठी फलंदाजी ही काही मोठी समस्या नाही. मला वाटते की विकेटकिपिंग ही समस्या ठरू शकते. त्याचा गुडघा दुखावला आहे. त्याला किपिंग करणे आवडते. जर तो विकेटकिपिंग करू शकला नाही तर तो आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचं हेच कारण ठरू शकतं.'

MS Dhoni CSK
IPL 2024 : जागे व्हा! बाबर, शाहीन आयपीएलमध्ये...स्वप्न पाहणाऱ्यांची हरभजनने काढली खरडपट्टी

इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन देखील म्हणाला की, धोनी हा असा व्यक्ती आहे की तो आपल्या वैयक्तिक हितासाठी संघाचं हित धोक्यात घालणार नाही. जर तो खेळू शकत नाहीये असं वाटलं तर तो त्वरित बाजूला होईल. धोनीच्या दृष्टीने फ्रेंचायजीचे यश आणि संघ याला प्राधान्य आहे.

आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज सलामीचा सामना आरसीबी सोबत खेळणार आहे. हा सामना चिदंबरम स्टेडियमवर 22 मार्च रोजी होणार आहे. याच सामन्याने आयपीएलच्या 17 व्या हंगामाची सुरूवात होईल.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com