Team India Squad T20 World Cup 2024 Harsha Bhogle on Hardik Pandya
Team India Squad T20 World Cup 2024 Harsha Bhogle on Hardik Pandya sakal
क्रिकेट

Team India Squad WC 2024 : 'जर पांड्या बॉलिग करत नाही, तर वर्ल्ड कपमध्ये...' दिग्गज खेळाडूच्या 'या' वक्तव्याने वातावरण तापल

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Team India Squad : स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसत आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांमध्ये त्याला काही विशेष दाखवता आलेले नाही. बॉल आणि बॅटने त्याची कामगिरी निराशाजनक आहे.

अशा परिस्थितीत त्याची टी-20 वर्ल्ड कप संघात निवड होणे कठीण मानले जात आहे. दरम्यान, प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी पांड्याच्या निवडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

आयपीएलचा सतरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माकडून काढून हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले होते. याबाबत सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला होता. पहिल्या तीन सामन्यांत संघाला सलग पराभवाला सामोरे जावे लागले.

मात्र, संघाने दिल्लीविरुद्ध पुनरागमन करत सलग दोन सामने जिंकले. आता संघाच्या नजरा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यावर आहेत. हार्दिक आपल्या कर्णधारपदाने क्रिकेट तज्ञ आणि चाहत्यांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला आहे.

त्याचबरोबर गोलंदाजी आणि फलंदाजीतही तो विशेष काही दाखवू शकला नाही. गेल्या पाच सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत फक्त एकच विकेट घेतली आहे. मागील पाच डावांमध्ये त्याने 11, 24, 34, 39 आणि 21* धावा केल्या आहेत. त्याचवेळी फलंदाजी करताना त्याची सर्वोच्च धावसंख्या 39 धावांची होती. अशा परिस्थितीत 30 वर्षीय अष्टपैलू खेळाडूसाठी टी-20 वर्ल्ड कप संघात खेळणे कठीण मानले जात आहे.

यादरम्यान हर्षा भोगले म्हणाले की, "जर हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नाही तर त्याला टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळेल का? जर तो गोलंदाजी करत नसेल तर तो भारताच्या टॉप 6 फलंदाजांपैकी एक आहे का? मी याबद्दल बोलत आहे. "मी' मला पूर्ण खात्री नाही, कारण जर तो गोलंदाजी करत नसेल तर त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल, जिथे खूप स्पर्धा आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT