Team India Squad WC 2024 : वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाला मिळाला 'X-फॅक्टर', सूर्याची घेणार जागा?

T20 World Cup 2024 Team India Squad : यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपसाठी बीसीसीआय लवकरच भारतीय संघाची घोषणा करू शकते. या संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार हाही मोठा प्रश्न आहे.
T-20 World Cup Team India Squad News Marathi
T-20 World Cup Team India Squad News Marathisakal

T20 World Cup 2024 Team India Squad : यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपसाठी बीसीसीआय लवकरच भारतीय संघाची घोषणा करू शकते. या संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार हाही मोठा प्रश्न आहे. आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये झालेल्या चुका टी-20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा व्हाव्यात असे भारतीय संघाला कधीही आवडणार नाही.

भारतीय संघात चौथ्या स्थानाचा शोध अनेक दिवसांपासून सुरू आहे. सूर्यकुमार यादव हा या पदासाठी योग्य असल्याचे क्षणभर वाटले. पण एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये सूर्या पूर्णपणे फ्लॉप ठरला. पण आता सूर्याच्या जागी 'एक्स फॅक्टर' सापडला आहे. जो चौथ्या क्रमांकावर बसू शकतो.

T-20 World Cup Team India Squad News Marathi
Team India Squad WC 2024 : पंत, संजू की इशान... टी-20 वर्ल्ड कपमध्ये विकेटकीपर म्हणून कोण खेळणार?

आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सला एक असा खेळाडू मिळाला आहे. जो मैदानात आली की थेट सामन्याची दिशा बदलून टाकतो. रियान पराग असे या खेळाडूचे नाव आहे. या हंगामात तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत एकूण 6 सामन्यात 284 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याच्या बॅटमधून 18 चौकार आणि 18 षटकार आले आहेत.

रियानच्या फलंदाजीची खास गोष्ट म्हणजे त्याने 155.19 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने तीन अर्धशतक ठोकले आहे. या कामगिरीच्या आधारे त्याची निश्चितपणे निवड होईल असे मानले जात असून सूर्याच्या जागी त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी बोलावले जाऊ शकते.

T-20 World Cup Team India Squad News Marathi
Team India Squad WC 2024 : रोहित कर्णधार… कार्तिक फिनिशर… वर्ल्ड कपमध्ये ही असू शकते टीम इंडियाची प्लेइंग-11

या आयपीएल हंगामातमध्ये सूर्यकुमारही चांगली फलंदाजी करत आहे, पण मोठ्या मॅचमध्ये मिस्टर 360 डिग्री बॅट शांत राहते. आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या आधीही सूर्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली होती, या सामन्यांमध्ये सूर्याने खूप धावा केल्या होत्या, पण वर्ल्ड कपसारख्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये सूर्या फ्लॉप ठरला होता.

या कारणास्तव, सूर्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकेल की नाही हे अद्याप सांगता येणार नाही. अशा स्थितीत रियान परागचा संघात समावेश करण्यात संघ निवडक रस दाखवतात का? की सूर्या या ठिकाणी खेळताना दिसणार आहे, हे थोड्याच दिवसात कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com