WPL 2024, DC vs RCB Final Sakal
Cricket

WPL 2024: नवा विजेता मिळणार! दिल्ली-बेंगलोर संघात होणारी फायनल कधी अन् कुठे पाहता येणार? घ्या जाणून

WPL 2024, DC vs RCB Final: वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळवला जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

WPL 2024, DC vs RCB Final: वूमन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (१७ मार्च) खेळवला जाणार आहे. हा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळवला जाणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश केलेला असल्याने यंदा डब्ल्युपीएलला नवा विजेता मिळणार हे निश्चित झाले आहे.

इतकेच नाही, तर या दोन्हीपैकी कोणताही संघ जिंकला, तरी त्या संघाच्या फ्रँचायझीचे हे पहिले विजेतेपदही ठरणार आहे. कारण या दोन्ही संघांच्या फ्रँचायझीला अद्याप आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेली नाही.

डब्ल्युपीएल २०२४ मध्ये साखळी फेरीनंतर गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवून दिल्ली कॅपिटल्सने थेट अंतिम सामना गाठला होता. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सला पराभूत करत अंतिम सामना गाठला आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणाऱ्या डब्ल्युपीएल अंतिम सामन्याचा तपशील

कधी आणि कुठे होणार डब्ल्युपीएलचा अंतिम सामना?

  • दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणारा अंतिम सामना 17 मार्च 2024 रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

किती वाजता सुरु होणार डब्ल्युपीएलचा अंतिम सामना?

  • दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. त्याआधी 7 वाजता नाणेफेक होईल.

डब्ल्युपीएलचा अंतिम सामना लाईव्ह कसा पाहता येईल?

  • दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणारा अंतिम सामना ज्या चाहत्यांकडे तिकीट्स आहेत,ते स्टेडियममध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहू शकतात. तसेच टीव्हीवर स्पोर्ट्स 18 चॅनेलवरही हा सामना पाहाता येईल.

  • तसेच जिओ सिनेमा ऍप किंवा वेबसाईवरही हा सामना मोफत लाईव्ह पाहाता येणार आहे.

असे आहेत संघ -

  • रॉयल चॅलेंजरस् बेंगलोर - स्मृती मानधना (कर्णधार), सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिवाईन, ऋचा घोष (यष्टीरक्षक), जॉर्जिया वेरेहम, दिशा कासट, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग, सिमरन बहादूर, इंद्राणी रॉय, शुभा सतीश, नादीन डी क्लर्क, सभिनेनी मेघना, केट क्रॉस, एकता बिश्त

  • दिल्ली कॅपिटल्स - मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझन कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शिखा पांडे, मिन्नू मणी, अश्वनी कुमारी, अपर्णा मंडल, तितास साधू, स्नेहा दीप्ती , ॲनाबेल सदरलँड, लॉरा हॅरिस, पूनम यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT