RCB won WPL 2024 X/wplt20
Cricket

WPL Prize Money : विजेतेपद जिंकल्यानंतर RCB झाली मालामाल! पाकिस्तान सुपर लीगपेक्षाही मिळाले दुप्पट पैसे

WPL 2024 Prize Money: वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पटकावले. या विजेतेपदानंतर बेंगळुरू संघाला मोठी बक्षीस रक्कमही मिळाली.

सकाळ डिजिटल टीम

WPL 2024 Prize Money: वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (17 मार्च) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात बेंगळुरूने 8 विकेट्सने विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले. त्यामुळे दिल्लीला सलग दुसऱ्या हंगामात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

दरम्यान, अंतिम सामन्यानंतर बेंगळुरू आणि दिल्ली संघाला मोठी बक्षीस रक्कमही मिळाली. विशेष म्हणजे पाकिस्तान सुपर लीगमधील विजेत्या आणि उपविजेत्या संघाला मिळणाऱ्या बक्षीस रकमेपेक्षा बेंगळुरू आणि दिल्लीला मिळालेली बक्षीस रक्कम जवळपास दुप्पट आहे.

डब्ल्युपीएल 2024 स्पर्धा जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला 6 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले, तसेच उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्स संघाला 3 कोटी रुपये देण्यात आले. गेल्यावर्षी डब्ल्युपीएल 2023 मध्येही विजेत्या मुंबई इंडियन्सलाही 6 कोटी रुपये मिळाले होते, तर दिल्ली कॅपिटल्सलाही 3 कोटी रुपये देण्यात आले होते.

दरम्यान सध्या चालू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग 2024 स्पर्धेच्या विजेत्याला यंदा 120 मिलियन पाकिस्तानी रुपये म्हणजेच भारतीय चलनानुसार 3.5 कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच उपविजेत्याला भारतीय चलनानुसार 1.4 कोटी रुपये मिळणार आहेत. पीएसएलचा अंतिम सामना 18 मार्चला खेळला जाणार आहे.

आयपीएल विजेत्यांवरही होतो पैशांचा वर्षाव

दरम्यान, आयपीएल जिंकणाऱ्या संघाला डब्ल्युपीएलपेक्षा दुप्पट बक्षीस मिळते. आयपीएल विजेत्याला 20 कोटी रुपये, तर उपविजेत्याला 12.5 कोटी रुपये मिळतात.

बेंगळुरूने दिल्लीला दिला पराभवाचा धक्का

डब्ल्युपीएल 2024 अंतिम सामन्यात दिल्लीने बेंगळुरूसमोर विजयासाठी 114 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग बेंगळुरूने 19.3 षटकात 2 विकेट्स गमावत 115 धावा करून सहज पूर्ण केला.

बेंगळुरूकडून बेंगळुरूकडून एलिस पेरीने सर्वाधिक नाबाद 35 धावा केल्या, तर सोफी डिवाईनने 32 आणि कर्णधार स्मृती मानधनाने 31 धावा केल्या. ऋचा घोषने नाबाद 17 धावा केल्या. दिल्लीकडून शिखा पांडे आणि मन्नू मनी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतले.

त्याआधी दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 18.3 षटकात सर्वबाद 113 धावा केल्या होत्या. दिल्लीकडून शफाली वर्माने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली, तर कर्णधार मेग लेनिंगने 23 धावा केल्या.

याशिवाय कोणालाही खास काही करता आले नाही. बेंगळुरूकडून गोलंदाजी करताना श्रेयंका पाटीलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर सोफी मेलिनेक्सने 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर आशा शोभनाने २ विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT