Dean Elgar India vs South Africa 1st Test esakal
क्रीडा

Dean Elgar : ये दुख खत्म काहे नहीं होता बे? डीन एल्गर जवळ पोहचूनही पुन्हा एकदा हातून निसटलं द्विशतक

अनिरुद्ध संकपाळ

Dean Elgar India vs South Africa 1st Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत डीन एल्गरने दमदार फलंदाजी केली. त्याने 287 चेंडूत 185 धावा ठोकल्या. त्याने चौथ्या आणि सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत संघाला 350 धावांच्या पार पोहचवले.

डीन एल्गरने दमदार फलंदाजी करून देखील त्याचे द्विशतक ठोकण्याचे स्वप्न काही पूर्ण होऊ शकले नाही. 185 धावांवर असताना शार्दुल ठाकूरने त्याला केएल राहुलकरवी झेलबाद केले. इतक्या जवळ येऊन द्विशतक हुकल्यावर तो प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू असला तरी वाईट वाटते. डीन एल्गरबाबत हे पहिल्यांदाच झालेलं नाही. यापूर्वी एल्गरचे कसोटी द्विशतक अवघ्या 1 धावेने हुकले होते.

एल्गर 199 धावांवर झाला बाद

डीन एल्गरसोबत असं दुसऱ्यांदा झालं आहे. त्याचे दुसऱ्यांदा कसोटी क्रिकेटमधील द्विशतक हुकले आहे. 2017 मध्ये तो कसोटी सामन्यात 199 धावांवर बाद झाला होता. सप्टेंबर महिन्यात 2017 मध्ये बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात एल्गरने सलामीला येत 388 चेंडू खेळले होते. त्याने 199 धावा केल्या होत्या. यात 15 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. मात्र त्याचं दिवशतक अवघ्या 1 धावेने हुकले होते. दक्षिण आफ्रिकेना हा सामना 333 धावांनी जिंकला होता.

सेंच्युरियनवरील कसोटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. पहिल्या डावात भारताने 245 धावा केल्या होत्या. त्यात केएल राहुलने 137 चेंडूत 14 चौकार आणि 4 षटकार मारत 101 धावांची झुंजार शतकी खेळी केली. रबाडाने पहिल्या डावात 59 धावांमध्ये 5 विकेट्स घेतल्या. तर नांद्रे बर्गरने 3 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

7th Pay Commission: 'या' कर्मचाऱ्यांची चांदी! ७ व्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा; योगी सरकारकडून पगारवाढीचं मोठं 'गिफ्ट'!

बदमाश पाकिस्तानी ! Mohsin Naqvi ने पत्रकाराला किडनॅप केले? PCB प्रमुखावर गंभीर आरोप, एका Video ने जगभरात खळबळ

State Cooperative Bank Profit: सामाजिक बांधिलकीसह आर्थिक बळकटी; राज्य सहकारी बँकेचा नफा ७०२ कोटींवर, सहकार क्षेत्रासाठी नवा आदर्श

Mumbai News: अफवांना पूर्णविराम! नव्या घरांचे स्वप्न आता हक्कासह पूर्ण होणार; धारावी प्रकल्पात मोठा ट्विस्ट

Pune Cyber Fraud: सायबर गुन्हेगारांचे पुणेकरांवर हल्ले तीव्र; शेअर ट्रेडिंग, मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्म व आयपीओ आमिषातून ९२ लाखांची लूट

SCROLL FOR NEXT