England vs India  E Sakal
क्रीडा

IND vs ENG : रुटच्या नाबाद 180 धावा; इंग्लंडला मिळाली अल्प आघाडी

मोहम्मद शमीने अँडरसनला बोल्ड करत इंग्लंडचा पहिला डाव 391 धावांत आटोपला.

सुशांत जाधव

England vs India 2nd Test Day 3 : कर्णधार ज्यो रुटच्या नाबाद 180 धावांच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 27 धावांची अल्प आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने 3 बाद 119 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. जॉनी बेयरस्टो आणि रुट यांनी 121 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणून पोहचवले. सेट झालेली ही जोडी मोहम्मद सिराजने फोडली. बेयरस्टोला त्याने कर्णधार कोहलीकरवी झेलबाद करत इंग्लंडला चौथा धक्का दिला. त्यानंतर कर्णधार रुटने बटलर आणि मोईन अली यांच्यासोबत पाचव्या आणि सहाव्या विकेटसाठी अनुक्रमे 54 आणि 58 धावांची भागीदारी करत इंग्लंडला अल्प आघाडी मिळवून दिली.

मोहम्मद शमीने अँडरसनला बोल्ड करत इंग्लंडचा पहिला डाव 391 धावांत आटोपला. ज्यो रुट 180 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर ईशांत शर्माने जोस बटलर 23 (42), मोईन अली 27 (72) आणि सॅम कुरनेच्या 0(1) रुपात मोक्याच्या क्षणी तीन विकेट घेतल्या. मोहम्मद शमीने दोन विकेट घेतल्या. बुमराहला एकही यश मिळाले नाही. मार्क वूडच्या रुपात इंग्लंडने रन आउटच्या रुपात एक विकेट गमावली.

टॉस जिंकून रुटने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 364 धावा केल्या होत्या. सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा 83 धावांवर बाद झाल्यानंतर पुजारा अवघ्या 9 धावा करुन माघारी फिरला. कर्णधार विराट कोहली 42 धावांवर सेट झाल्याचे दिसत असताना रॉबिन्सनने त्याला झेल बाद केले.

लोकेश राहुलच्या 129 धावा आणि पंत (37) आणि रविंद्र जाडेजाने केलेल्या 40 धावांच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात 364 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. अवघ्या 23 धावांवर इंग्लंडने लागोपाठ दोन विकेट गमावल्या होत्या. सलामीवीर बर्न्स आणि ज्यो रुटने ही पडझड थांबवली. बर्न्स बाद झाल्यानंतर रुटने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. शेवटपर्यंत त्याच्या खेळीत एक नजाकत पाहायला मिळाली. तो लॉर्ड्सच्या मैदानावर आणखी एक द्विशतक करणार का? असे वाटत होते. पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. शेवटपर्यंत नाबाद राहून तो माघारी फिरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Earthquake : मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के ! अचानक भयंकर आवाज अन् जमीन थरथरली; भीतीने लोक घरांबाहेर पळाले

Gold Rate Today: जुलैच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याने दिला मोठा धक्का! 24 कॅरेट सोनं तब्बल 3,770 रुपयांनी महागलं; पाहा आजचा ताजा भाव

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

SCROLL FOR NEXT