VIDEO : ईशांतनं विणलं जाळं; किंग कोहलीनं घेतला भन्नाट झेल

72 चेंडूचा सामना करुन संयमीरित्या कर्णधाराला साथ देणारा मोईन अली 27 धावांवर किंग कोहलीच्या हाती झेल देऊन माघारी फिरला.
Virat Kohli
Virat KohliTwitter
Updated on

England vs India, 2nd Test : इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट आणि जॉनी बेयरस्टो यांची जोडी फुटल्यानंतर मैदानात उतरलेला जोस बटलर 23 धावा करुन माघारी फिरला. त्याच्या स्वरुपात ईशांत शर्माने सामन्यातील आपली पहिली विकेट मिळवली. त्यानंतर ईशांत शर्माने रुट आणि मोईन अली यांची सेट होत असलेली जोडी फोडण्याची मोठी कामगिरी फत्ते केली. एका बाजूने ज्यो रुट खिंड लढवत असताना ईशांत शर्माने दुसऱ्या बाजूने इंग्लंड संघाला खिंडार पाडण्यात यश मिळवलं. मोईन अलीला त्याने खास प्लॅन करुन जाळ्यात अडकवलं. 72 चेंडूचा सामना करुन संयमीरित्या कर्णधाराला साथ देणारा मोईन अली 27 धावांवर किंग कोहलीच्या हाती झेल देऊन माघारी फिरला.

इंग्लंडच्या पहिल्या डावातील 111 व्या षटकात ईशांतच्या गोलंदाजीवर मोईन अली संघर्ष करताना दिसला. त्याची विकेट घेण्यापूर्वी ईशांत शर्मा आणि किंग कोहली यांच्यात काहीतरी संवाद झाल्याचे पाहायला मिळाले. आणि लगेच पाचव्या चेंडूवर मोईन अलीच्या रुपात ईशांतने इंग्लंडला सहावा धक्का दिला. विराट कोहलीने स्लीपमध्ये कमालीचा कॅच घेतल्याचे पाहायला मिळाले. जमीनीलगतचा चेंडू अप्रतिमरित्या कोहलीने झेलमध्ये रुपांतरित केला. सॅम कुरेनला तर ईशांतने आल्या पावली माघारी धाडले. लागोपाठ मिळालेल्या दोन विकेटमुळे भारतीय संघाच्या गोलंदाजीत पुन्हा एकदा धार आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसरा दिवस हा इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने गाजवला. दुसऱ्या दिवसाअखेर अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या रुटने 100 + धावा करुन इंग्लंडला सामन्यात टीम इंडियाच्या बरोबरीत आणण्याचे मोठी जबाबदारी रुटने पार पाडली. त्याला जॉनी बेयरस्टोने अर्धशतकी खेळी करुन उत्तम साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर रुटने बटलरसोबत 54 तर मोईन अलीसोबत 58 धावांची भागीदारी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com