Sakal Exclusive Danish Kaneria sakal
क्रीडा

'आता फक्त 8 दिवसांची प्रतीक्षा...', अयोध्येत मंदिर सोहळ्याआधी पाकिस्तानच्या खेळाडूने दिला 'जय श्री राम'चा नारा

Kiran Mahanavar

Danish Kaneria On Ram Mandir : अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात येत्या 22 जानेवारीला रामललाचा अभिषेक केला जाणार आहे. यादरम्यान देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे, मंदिराच्या उद्घाटनासाठी देश तर सज्ज झालाच आहे, मात्र पाकिस्तानातून देखील उत्साह दिसून येत आहे. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे.

अयोध्येतील राम मंदिरच्या अभिषेकासाठी फक्त काही दिवस राहिले आहेत, यादरम्यान पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने सोशल मीडियावर लिहिले आहे की, आमचा राजा श्री रामचे भव्य मंदिर तयार आहे. आणि आता फक्त 8 दिवसांची प्रतीक्षा आहे. जय-जय श्री राम.

कनेरियाने या पोस्टसोबत स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत तो भगवा झेंडा घेऊन उभा आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.

दानिश कनेरिया पाकिस्तान क्रिकेट संघात आपल्यासोबत होणाऱ्या भेदभावाबाबत अनेकवेळा सार्वजनिक मंचांवर वक्तव्ये करत आहे. ते सातत्याने भारताच्या समर्थनार्थ बोलत आहेत. अलीकडेच मालदीव आणि भारत यांच्यातील वादाच्या वेळी त्यांनी एक पोस्टही टाकली होती. त्याने फक्त लक्षद्वीप लिहिले आणि फायर इमोजी टाकला. दानिश कनेरिया गेल्या काही काळापासून सातत्याने पीएम मोदींची स्तुती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! 10 ग्रॅम अन् 1 ग्रॅमसाठी आता किती रुपये मोजावे लागणार?

Aurangabad Hospital: आगीतून वाचवलेल्या जुळ्यांचा मृत्यू; एशियन हॉस्पिटलमधून दाखल केले होते 'घाटी' मध्ये, कुटुंबावर शोककळा

पुण्यात प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाकरीत रबरबँड, ग्राहकानं शेअर केला VIDEO

आधी हात पकडला, नंतर कपडे काढत नको ते करण्याचा प्रयत्न, ओला चालकाचं महिलेसोबत गैरकृत्य; मध्यरात्री नवी मुंबईत काय घडलं?

Marathi News Live Updates : टीएमसी खासदार नदीमुल हक यांच्याशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीचे छापे

SCROLL FOR NEXT