Ind Vs Afg 2nd T20 : इंदूरमध्ये आज कसे आहे हवामान? सामन्यापूर्वी जाणून घ्या खेळपट्टीचा मूड

Holkar Cricket Stadium Pitch Report Indore Weather Forecast News :
Holkar Cricket Stadium Pitch Report Indore Weather Forecast News :
Holkar Cricket Stadium Pitch Report Indore Weather Forecast News :

India Vs Afghanistan 2nd T20 News : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज (14 जानेवारी) इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

रोहित आणि कंपनी हा सामना जिंकून ट्रॉफीवर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर विरोधी संघाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. अशा स्थितीत आजचा सामना अतिशय रोमांचक होणार असल्याचे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. सामन्याआधी इंदूरमध्ये हवामान आणि खेळपट्टीचा मूड कसा आहे हे जाणून घेऊया....

Holkar Cricket Stadium Pitch Report Indore Weather Forecast News :
Yuvraj Singh : 5 वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती! आता 'सिक्सर किंग' युवराज घेणार टीम इंडियात मोठी जबाबदारी?

जाणून घेऊया कशी खेळपट्टी -

होळकर स्टेडियमवर आतापर्यंत टी-20 स्वरूपाचे एकूण तीन सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोन सामने जिंकले आहेत, तर दुसऱ्या डावात खेळणारा संघ एकदाच जिंकला आहे.

होळकर मैदान हे फलंदाजांचे नंदनवन मानले जाते. येथील आऊटफिल्ड अतिशय वेगवान आहे, म्हणजेच चेंडू बॅटशी संपर्क साधल्यानंतर तो सरपटत पॅव्हेलियनमध्ये जातो.

होळकर स्टेडियमवर पहिल्या डावाची सरासरी 209 धावांची आहे. या मैदानावर टीम इंडियाने आतापर्यंत एकूण तीन टी-20 सामने खेळले आहेत. येथे त्याने दोन सामने जिंकले आहेत, तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Holkar Cricket Stadium Pitch Report Indore Weather Forecast News :
Ind vs Afg 2nd T20 : कोहलीच्या पुनरागमनामुळे 'या' खेळाडूचा पत्ता कट, शुभमन गिलही बाहेर? जाणून घ्या Playing XI

जाणून घेऊया कसे आहे हवामान -

हवामान खात्यावर विश्वास ठेवला तर खेळाडूंना आज मोहालीएवढ्या थंडीचा सामना करावा लागणार नाही. होळकर स्टेडियममध्ये हवामान स्वच्छ राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. सामना सुरू असताना तापमान 22 अंशांच्या आसपास राहू शकते.

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com