Nostradamus FIFA World Cup esakal
क्रीडा

Nostradamus FIFA World Cup: काहीही झालं तरी मेस्सीच होणार चॅम्पियन! सांगणारा मॉडर्न नॉस्ट्रेडेमस आहे तरी कोण?

मेस्सीच्या बाबतीत एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्याकडे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nostradamus Athos Salome Lionel Messi Argentina: लियोनेल मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्ड कप होता. जगभरामध्ये आपल्या खेळामुळे असंख्य चाहते असणाऱ्या या खेळाडूच्या शेवटच्या सामन्याला प्रेक्षकांनी मोठी उपस्थिती लावली होती. त्याचा निरोप समारंभही मोठ्या दिमाखात झाला. त्याच्यासह लाखो चाहत्यांना यावेळी अश्रु अनावर झाले होते.

मेस्सीच्या बाबतीत एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्याकडे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे. काहीही झालं तरी मेस्सी हाच चॅम्पियन होणार अशी भविष्यवाणी एकानं केली होती. त्यामुळे मेस्सी तर चर्चेत आहेच पण ज्यानं ती भविष्यवाणी केली होती तो देखील भलताच चर्चेत आला आहे. मेस्सीनं फ्रान्सला पेनल्टी शुटआऊटमध्ये हरवून विश्वकपवर आपल्या नावाची मोहोर उमटवली. त्या पेनल्टी किकनं साऱ्या फुटबॉल चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

लाखो चाहत्यांनी मेस्सीवर कौतूकाचा वर्षाव केला. गेल्या काही दिवसांपासून लियोनेल मेस्सी आणि त्याचा शेवटचा वर्ल्ड कप यावर चर्चा होत होती. काहीही झालं तरी तो त्याच्या देशाला वर्ल्ड कप जिंकून देणार याविषयी बोललं जातं होतं. कालची मॅच झाली आणि मेस्सीनं साऱ्या चाहत्यांना खूश केलं. अर्जेटिनानं फ्रान्सवर चार- दोन अशी मात केली. अर्जेटिनानं तिसऱ्यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. भलेही आता मेस्सीवर सगळ्यांकडून कौतूकाचा वर्षाव होत असला तरी हे होणारचं होतं अशी भविष्यवाणी एकाने केली होती.

मेस्सीबाबत भविष्यवाणी करणारा जो ज्योतिषी आहे सॅलोम अॅथॉस. त्यानं यंदाचा फिफा कोण जिंकणार आणि त्यामध्ये कोणता खेळाडू लक्षवेधी ठरणार याविषयी भविष्यवाणी केली होती. अर्जेटिंनाचा विजय आणि त्यात मेस्सीची चमकदार कामगिरी यामुळे सॅलोम चर्चेत आला आहे. त्यानं सांगितलं होतं की, मेस्सीच्या कॅप्टन्सीमध्ये अर्जेटिना फायनलमध्ये प्रवेश करणार आणि तो सामना जिंकणार. फ्रान्स विरुद्ध तो सामना होणार असेही त्यानं सांगितले होते. मेस्सीच्या टीमनं जेव्हा क्रोएशियाला हरवून फायनलमध्ये धडक मारली आणि दुसरीकडे फ्रान्सनं मोरक्कोला पराभूत केले.

क्रोएशिया आणि मोरक्कोचा पराभव होताच सोशल मीडियावर सॅलोमचे ते वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे. काहीही झालं तरी मेस्सी हा विश्वविजेत्या संघाचा कर्णधार असणार आणि तो चॅम्पियन असणार असं वक्तव्य सॅलोमनं केलं होतं. सध्या त्याच्या त्या भविष्यवाणीची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. सॅलोमविषयी आणखी सांगायचे झाल्यास तो सोशल मीडियावर देखील त्याच्या वेगवेगळया स्टाईलसाठी ओळखला जातो. त्याच्या व्हिडिओला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे.

मॉडर्न नॉस्ट्रेडेमस म्हणून त्याला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून तो फिफाा वर्ल्डकपमुळे चर्चेत आला होता. त्या वर्ल्डकपच्या निमित्तानं त्यानं जी काही भविष्यवाणी केली होती ती खरी ठरल्यानं आता सॅलोमवर देखील कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कुर्ला-ट्रॉम्बेतील झोपड्यांना मध्य रेल्वेच्या नोटिसा, ३० दिवसांचा अल्टिमेटम; नेमकं कारण काय?

Big Breaking : अर्शदीप सिंगची IND vs WI पाचव्या ट्वेंटी-२०तू माघार? भुवनेश्वर कुमारची एन्ट्री, टीम इंडियाची Playing XI जवळपास निश्चित

RECIPE: तुम्ही कधी दोडका-पनीरची भाजी खाल्ली का? नीना गुप्ता यांनी सांगितली सोपी रेसिपी, जाणून घ्या...

Marathi News Live Updates: दुष्काळाच्या संकटात पशुधनाला चाऱ्याचा तुटवडा भासू नये म्हणून प्रशासनाचा पुढाकार, नांदेडमध्ये पशुपालकांसाठी चारा मित्र उपक्रम राबवणार

Retirement Planning: निवृत्तीनंतरचे सुरक्षित भविष्य म्हणजे एनपीएस कॉर्पोरेट

SCROLL FOR NEXT