मोठ्या तोऱ्यात गेली दीपिका ट्रोल झाली, नेटकऱ्यांनी झाडलं! 'तुला तर...'| Deepika trolled fifa | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepika trolled fifa

Deepika trolled fifa: मोठ्या तोऱ्यात गेली दीपिका ट्रोल झाली, नेटकऱ्यांनी झाडलं! 'तुला तर...'

Deepika Padukone trolled fifa world cup final 2022 look viral: जगभरात फिफाचा फिव्हर आहे. गेल्या काही दिवसांपासून फुटबॉल चाहत्यांना या वर्ल्डकपच्या निमित्तानं मोठी पर्वणी होती. काल फिफामधील शेवटचा सामना पार पडला. यावेळी बॉलीवूडच्या दिग्गजांनी त्या सामन्याला उपस्थिती लावली होती. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचाही समावेश होता.

दीपिका फिफामध्ये गेली खरी मात्र ती आता ट्रोल होताना दिसत आहे. दीपिकावर नेटकऱ्यांनी आगपाखड केली आहे. दीपिकाच्या चाहत्यांनी मात्र फिफामध्ये दीपिकाला एवढी मोठी संधी मिळाली असतानाही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करणे ही गोष्ट त्यांना आवडलेली नाही. दीपिका गेल्या काही दिवसांपासून पठाण या चित्रपटामुळे ट्रोल होताना दिसत आहे. त्या चित्रपटातील बेशरम रंग नावाच्या गाण्यामध्ये तिनं भगव्या रंगाची बिकीनी परिधान केली होती.

त्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन दीपिका नेटकऱ्यांच्या रडारवर आहे. फिफामध्ये दीपिकाला फिफाची ट्रॉफी उंचावण्याचा मान मिळाला होता. असा बहुमान मिळवणारी दीपिका ही पहिलीच भारतीय सेलिब्रेटी आहे. असे असताना देखील नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. दीपिकाला सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आपला राग व्यक्त केला आहे. पठाण मधील मुख्य अभिनेता शाहरुखही यावेळी फिफामध्ये सहभागी झाला होता.

दीपिकाला व्हावं लागलं ट्रोल...

दीपिकाला एवढा मोठा मान मिळाला पण तिला नेटकऱ्यांनी ट्रोलही केले आहे. त्यामुळे दीपिकाच्या चाहत्यांची काही अंशी निराशा झाली आहे. आपली आवडती अभिनेत्री ही जगातील सर्वात मोठ्या अशा फिफामध्ये प्रमुख पाहूणी म्हणून गेली आणि आपल्याच लोकांनी तिला ट्रोल केले हे काही बरे नव्हे. अशा प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

हेही वाचा: Shah Rukh Khan Fifa World Cup 2022: 'भांडी घासली, कपडे धुतली' किंग खान फिफामध्ये बोलला!

हेही वाचा: Deepika Padukone In FIFA: फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी लॉन्च करण्यासाठी दीपिकाच का?...इथं आहे उत्तर

अनेकांची डोकेदुखी ही दीपिकाची हेअरस्टाईल होती. किमान फिफामध्ये तरी चांगले किमान कपडे घालून जायचे होते. कसा अवतार करुन गेलीस. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दीपिकाला मिळताना दिसत आहे. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून दीपिका ही ट्रोल होताना दिसते आहे. तिचं ते बेशरम रंग नावाचे गाणे व्हायरल झाले होते. तेव्हापासून सोशल मीडियावर दीपिका ट्रोल होत आहे.