fifa world cup 2022 third place match between morocco and croatia  
क्रीडा

FIFA WC22: शेवट 'गोड' करण्याचे उद्दिष्ठ! मोरोक्कोसमोर क्रोएशियाला हरवून इतिहास रचण्याची संधी

विश्‍वकरंडक जिंकण्याचे स्वप्न भंग पावले... आता तिसऱ्या स्थानासाठी लढत

Kiran Mahanavar

FIFA World Cup 2022 Third Place Morocco vs Croatia : विश्‍वकरंडक जिंकण्याचे स्वप्न भंग पावले... आता तिसऱ्या स्थानासाठी लढणार... क्रोएशिया - मोरोक्को या दोन देशांची ही कथा. फिफा विश्‍वकरंडकात आज अल रयान येथे या दोन देशांमध्ये ब्राँझपदकासाठी लढत रंगणार आहे. दोन्ही देश स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतील.

मोरोक्कोने यंदाच्या विश्‍वकरंडकात ठसा उमटवला आहे. उपांत्य फेरीपर्यंत पोहचत त्यांनी इतिहास रचला आहे. त्यामुळे आजच्या लढतीचा निकाल कोणताही लागला, तरी मायदेशात त्यांचे जंगी स्वागत होईल, यात शंका नाही. या वेळी मोरोक्को संघाचे प्रशिक्षक वालीद रेगरेगी म्हणाले, मानसिकदृष्ट्या विचार केल्यास खूप आव्हानात्मक आहे. आता उद्याच्या लढतीत राखीव खेळाडूंना अंतिम संघात खेळण्याची संधी दिली जाईल. आमचा संघ अव्वल दर्जापासून दूर नाही, हे दाखवून दिले. आता तिसऱ्या क्रमांकाची लढतही जिंकू, असा विश्‍वासही पुढे त्यांनी व्यक्त केला.

क्रोएशियाच्या संघाने सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला. गेल्या विश्‍वकरंडकात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यंदा त्यांना तिसऱ्या स्थानासाठी लढावे लागत आहे. याआधी १९९८मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

साखळी फेरीत गोलशून्य बरोबरी

क्रोएशिया व मोरोक्को हे दोन्ही संघ यंदाच्या विश्‍वकरंडकात एकाच गटात होते. फ गटामध्ये दोन्ही देशांचा समावेश होता. या गटातील पहिली लढत याच दोन देशांमध्ये झाली. या लढतीत गोलशून्य बरोबरी झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. या गटातून हेच दोन संघ बाद फेरीत पोहोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT