Hardik Pandya Instagram esakal
क्रीडा

Hardik Pandya : 2,50,00,000! हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवर घातला 'जागतिक दर्जा'चा धुमाकूळ

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya Instagram : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने गंभीर अशा पाठीच्या दुखापतीतून सावरत भारतीय संघात जोरदार पुनरागमन केले. हार्दिकची कारकिर्दीत जवळपास संपली अशी चर्चा होती. परंतु त्याने भारतीय संघात धडाकेबाज पुनरागमन तर केलेच मात्र त्याने भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपदही पटकावले.

याच क्रिकेटच्या मैदानावर धुमाकूळ घालणाऱ्या हार्दिक पांड्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील धुमाकूळ घातला आहे. तो इन्स्टाग्रामवर 25 मिलियन (2 कोटी 50 लाख) फॉलोअर्स असलेला सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू ठरला आहे. हार्दिक पांड्या मैदानाबरोबरच सोशल मीडियावर देखील दमदार कामगिरी करतोय. हार्दिक हा टीम इंडियामधील एक ग्लॅमरस क्रिकेटपटू आहे.

विशेष म्हणजे हार्दिक पांड्याचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स हे जागतिक स्तरावरील मोठमोठ्या खेळाडूंपेक्षाही जास्त आहेत. यातील राफेल नदाल, रॉजर फेडरर, मॅक्स वेरस्तापन आणि अर्लिंग हालँड यांच्या फॉलोअर्सपेक्षाही हार्दिकचे फॉलोअर्स जास्त आहेत.

हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपले फॉलोअर्स 25 मिलियन झाल्याची खुषखबरी दिली, तो म्हणाला, 'माझ्यावर प्रेम केल्याबदद्ल माझ्या चाहत्यांचे आभार. प्रत्येक फॅन माझ्यासाठी खास आहे. मी त्या सर्वांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर प्रेम करत माला पाठिंबा दिला. त्यांनी हे प्रेम मला प्रत्येक वर्षी दिले आहे.'

पांड्या सोशल मीडियावर सातत्याने पोस्ट करतो. त्यामुळे त्याचे चाहते त्याच्याशी ऑन अँड ऑफ द फिल्ड देखील जोडले जातात. तो आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे भावनिकदृष्ट्या जोडला गेला आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar News : नातवाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आजीनेही सोडले प्राण; खानदेशी कुटुंबावर दुहेरी दुःखाचा आघात

Latest Marathi News Update : औसा तहसील कार्यालयावर महिलांचा मोर्चा; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्यात कार घालण्याचा प्रयत्न; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

Kannad News : शेतकऱ्यांमध्ये संभ्रम! कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत २,५०५ शेतकरी पात्र

Pune Ganeshotsav : पुण्यात यंदा प्रथमच ‘राज्य सांस्कृतिक महोत्सव’; शनिवारवाड्यावर ढोल-ताशा, काव्य आणि लोककलेचा त्रिवेणी संगम

SCROLL FOR NEXT