Rehan Ahmed Record : रेहान अहमदने पदार्पणातच रचला इतिहास; 26 वर्षापूर्वीचे रेकॉर्ड तोडले

Rehan Ahmed ODI Debut
Rehan Ahmed ODI Debutesakal

Rehan Ahmed ODI Debut : बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. या वनडे मालिकेत इंग्लंडचा युवा फिरकीपटू रेहान अहमदने इतिहास रचला. रेहना हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात पदार्पण करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला. रेहनचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे. या सामन्यातच रेहानने 26 वर्षापूर्वाचा रेकॉर्ड तोडले.

रेहानच्यापूर्वी इंग्लंडकडून सर्वात कमी वयात वनडे पदार्पण करण्याचा रेकॉर्ड हा बेन होलिओक यांच्या नावावर होता. होलिओकने वनडेमध्ये 1997 मध्ये लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात पदापर्ण केले. ज्यावेळी होलिओकने वनडे पदार्पण केले त्यावेळी त्याचे वय 20 वर्षे 21 दिवस इतके होते.

Rehan Ahmed ODI Debut
IND vs AUS ODI: संघाला पुन्हा एकदा मोठा धक्का! दिग्गज खेळाडू वनडे मालिकेतून बाहेर

तर रेहान अहमदने इंग्लंडकडून वनडे क्रिकेटमध्ये 18 वर्षे आणि 205 दिवस वय असताना पदार्पण केले आहे. इंग्लंडकडून सर्वात कमी वयात वनडे पदार्पण करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानावर सॅम कुरन याचे नाव येते. त्याने 20 वर्षे 67 दिवस वय असताना इंग्लंडकडून वनडे पदार्पण केलले होते.

वनडे क्रिकेटमध्ये तसेही सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचे रेकॉर्ड हे हसन राजाच्या नावावर आहे. हसन राजाने पाकिस्तानकडून वनडे मध्ये पदार्पण केले होते. यावेळी तो 14 वर्षे 233 दिवसांचा होता.

Rehan Ahmed ODI Debut
IND vs AUS : ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल! चौथ्या कसोटीला कांगारूं कर्णधार मुकणार

रेहान हा इंग्लंडकडून सर्वात कमी वयात कसोटी क्रिकेट खेळणारा खेळाडू देखील ठरला. रेहाने 18 वर्षे 126 दिवस वय असताना कसोटीत पदार्पण केले.

(Sports Latest News)

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com