Hardik Pandya Reveal Why Umran Malik Given Very Important Last Over Against Ireland esakal
क्रीडा

शेवटचे षटक उमरान मलिकलाच का दिले, हार्दिक पांड्या म्हणाला...

अनिरुद्ध संकपाळ

डब्लिंग : भारताने आयर्लंडविरूद्धचा दुसरा टी 20 सामना 4 धावांनी जिंकून मालिका 2 - 0 ने खिशात टाकली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात 225 धावा करून देखील आयर्लंडच्या फलंदाजांनी चांगलेच टेन्शन दिले होते. मात्र अखेरचे षटक टाकणाऱ्या उमरान मलिकने शेवटचे तीन चेंडू चांगला टाकत सामना जिंकून दिला. शेवटच्या षटकात आयर्लंडला विजयासाठी 17 धावांची गरज होती. मात्र उमरान मलिकने 12 धावा देत सामना भारताच्या बाजूने झुकवला. (Hardik Pandya Reveal Why Umran Malik Given Very Important Last Over Against Ireland)

दरम्यान, सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्याला सामन्याचे महत्वाचे शेवटचे षटक नवख्या उमरान मलिकला का दिले असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी हार्दिक म्हणाला की, 'मला कोणताही गोष्टीचा दबाव घ्यायचा नव्हता. मला सध्याच्या घडीचा विचार करायचा होता आणि मला उमरान मलिकला पाठिंबा द्यायचा होता. त्याच्याकडे वेग आहे. या वेगासमोर षटकात 18 धावा करणे सोपे नसते. त्यांनी काही आकर्षक फटकेबाजी केली. त्यांनी चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली. याचे श्रेय त्यांना द्यावेच लागले. तसेच आपल्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी प्रभावी मारा केला त्यांचे कौतुक करणे गरजेचे आहे.'

हार्दिक पांड्याने आयर्लंडमध्ये भारतीय संघाला मिळालेल्या मोठ्या पाठिंब्याबाबत देखील आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला 'प्रेक्षकांची संख्या मोठी होती. त्यांचे दिनेश कार्तिक आणि संजू सॅमसन हे फेव्हरेट होते. पृथ्वीच्या या टोकावर आलेला हा अनुभव खूप मस्त होता. आम्हाला पाठिंबा द्यायला खूप लोकं मैदानावर आली होती. आम्ही त्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्यांचे खूप खूप आभार.'

पांड्या पुढे म्हणाला, 'तुम्ही लहान असताना तुमचे एकच ध्येय असते देशाकडून खेळणे. भारताचे नेतृत्व करणे आणि पहिला सामना जिंकणे हे खूप खास असतं, आता मालिका देखील जिंकणे खासच आहे. उमरान आणि दीपकच्या कामगिरीवर खूष आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

SCROLL FOR NEXT