cricket sakal
क्रीडा

ICC Men's Cricket World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेला बांगलादेशची धास्ती; वानखेडेवर पुन्हा धावांचा पाऊस पडणार

बांगलादेश संघाने एकदिवसीय विश्वकरंडकात दक्षिण आफ्रिकेला दोन वेळा पराभूत केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

जयेंद्र लोंढे

मुंबई - श्रीलंका, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या तिन्ही देशांना धूळ चारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे विमान आकाशावरून वेगवान धावत आहे. मात्र धरमशालामधील लढतीत नेदरलँड्स संघाकडून धक्का मिळाल्यामुळे त्यांचा संघ उद्या होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या लढतीत सावध झाला आहे.

बांगलादेश संघाने एकदिवसीय विश्वकरंडकात दक्षिण आफ्रिकेला दोन वेळा पराभूत केले आहे. या इतिहासाकडे कानाडोळा न करता दक्षिण आफ्रिका संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये उतरणार आहे. बांगलादेशसाठी ही लढाई अटीतटीची असणार आहे. त्यांच्यासाठी पुढील सर्व लढतींमध्ये विजय आवश्यक आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियम हे फलंदाजांसाठी नंदनवन म्हणून ओळखले जाते. यंदाच्या विश्वकरंडकातील पहिल्याच लढतीत दक्षिण आफ्रिकेने ३९९ धावांचा पाऊस पाडला. इंग्लंडला या धावसंख्येचा पाठलाग करता आला नाही. त्यांचा संघ १७० धावांवरच गारद झाला. या लढतीच्या पूर्वसंध्येला खेळपट्टी झाकून ठेवली होती. मात्र येथील खेळपट्टीवर पुन्हा एकदा धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेने यंदाच्या विश्वकरंडकात प्रथम फलंदाजी करताना धावाच धावा उभारल्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध त्यांनी ५ बाद ४२८ धावांचा डोंगर उभारला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांना ७ बाद ३११ धावा करता आल्या होत्या. गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध ७ बाद ३९९ धावांची फटकेबाजी केली होती. नेदरलँड्स यांच्याविरुद्ध त्यांना २४६ धावांचे आव्हान ओलांडता आले नव्हते. याच लढतीत त्यांनी धावांचा पाठलाग केला होता.

२००७ व २०१९ मध्ये पराभूत

दक्षिण आफ्रिका-बांगलादेश यांच्यामध्ये एकदिवसीय विश्वकरंडकातील चार लढती झाल्या आहेत. यापैकी दोन लढतींमध्ये बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेवर मात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: विराट कोहलीचा चौकार अन् मोडला राहुल द्रविडच्या नावावरील मोठा विक्रम! इंग्लंडमध्येही ठरला 'किंग'

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

भारतातून OnePlus ची एक्झिट? 2027 पर्यंत कंपनी बंद होणार असल्याची चर्चा; ज्यांच्याकडे आत्ता मोबाईल आहे त्यांनी काय करायचं? वाचा

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडी कायम

Varandha Ghat Landslide Risk: वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT