Rajvardhan Hangargekar Hat Trick Of Sixes  esakal
क्रीडा

Video: U19 World Cup मध्ये षटकारांचा मराठमोळा धमाका

अनिरुद्ध संकपाळ

त्रिनिदाद आणि टोबॅगो: आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये (ICC Under 19 World Cup 2022) भारताने आयरलँडवर १७४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताकडून जरी हरनूर सिंगने ८८ धावांची सर्वात मोठी खेळी केली असली तरी सामन्यात षटकारांचा तडका लावण्यात मराठमोळा राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) आघाडीवर होता. त्याने फक्त १७ चेंडूत ३९ धावांची धमाकेदार खेळी करत भारताला ३०० चा टप्पा ओलांडून दिला होता. (Rajvardhan Hangargekar Hat Trick Of Sixes)

19 वर्षाखालील वर्ल्डकपच्या (U19 World Cup) दुसऱ्या सामन्यात भारत आयरलँडसमोर (India vs Ireland) २७० ते २८० धावांचे टार्गेट सेट करेल असे वाटत होते. मात्र पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राजवर्धन हंगरगेकरने (Rajvardhan Hangargekar) फक्त १७ चेंडूत ३९ धावांची खेळी करत भारताला ३०० च्या पार पोहचवले. त्याने या आपल्या आतशी खेळीत तब्बल ५ षटकार खेचले तर एक चौकार लगावला. म्हणजे त्याने आपल्या ३९ धावांपैकी ३४ धावा या षटकार आणि चौकारांनीच केल्या.

हंगरगेकरने आयरलँडच्या ४९ व्या षटकात डावखुऱ्या नॅथन मॅकगायरची धुलाई केली. त्याने त्याच्या षटकात दोन षटकार खेचले. त्यानंतर त्याने आयरलँडचा वेगवान गोलंदाज मुजामिल शेरजादला टार्गेट केले. त्याने शेरजादच्या एका षटकात षटकारांची हॅट्ट्रिक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT