जोकोविचचे खायचे दात वगेळ आणि दाखवायचे वेगळे? Novak Djokovic huge investment in QuantBioRes | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Novak Djokovic huge investment in QuantBioRes
जोकोविचचे खायचे दात वगेळ आणि दाखवायचे वेगळे?

जोकोविचचे खायचे दात वगेळ आणि दाखवायचे वेगळे?

कोपनहेगन : कोरोनाला (Coronavirus) मात देण्यासाठी लसीकरण हा एकमेव मार्ग असल्याचे अनेक जाणकारांनी सांगितले आहे. अनेक देशांनी जोरदार लसीकरण (Corona Vaccination) मोहीम देखील राबवली आहे. मात्र काही लोकांनी कोरोनावरची लस न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा (Novak Djokovic) देखील समावेश आहे. त्याच्या या हट्टामुळे त्याला ऑस्ट्रेलियन ओपनला (Australian Open) मुकावे लागले. आता नोव्हाक जोकोविचबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Novak Djokovic huge investment in QuantBioRes company which trying to make corona medicine)

हेही वाचा: राफेल नदाल, बार्ती, ओसाकाची वाटचाल

एका माध्यमाच्या रिपोर्टनुसार कोरोनावरील औषध (Corona Medicine) तयार करणाऱ्या एका बायोटेक कंपनीच्या सीईओनेच याबाबतचा खुलासा केला आहे. एफपीने दिलेल्या माहितीनुसार डेन्मार्कची कंपनी QuantBioRes चे सीईओ इवान लोनकारविच यांनी सांगितले की त्यांच्या बायोटेक फर्ममध्ये नोव्हाक जोकोविचची मोठी भागीदारी आहे. याचबरोबर तो सह संस्थापकही आहे. ते म्हणाले की, 'जोकोविच हा माझ्या कंपनीत्या संस्थापकांपैकी एक आहे. या कंपनीची सुरुवात आम्ही २०२० मध्ये केली होती.' डेन्मार्कच्या व्यापार नोंदणी कार्यालयात नोंदवलेल्या माहितीनुसार या कंपनीत जोकोविच आणि त्याची पत्नी येलेना यांची मिळून ८० टक्के भागीदारी आहे. डेन्मार्क, स्लोवेनिया, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन मध्ये कंपनीचे २० कर्मचारी आहेत.

हेही वाचा: गब्बर इज बॅक! आल्या आल्या हेडन, रुटला टाकले मागे

लोनकारविच यांनी सांगितले की, 'आमचा उद्येश विषाणू आणि बॅक्टेरियाशी लढणे हा आहे. आम्ही कोरोनाविरुद्ध लढणारे औषध तयार करण्याचा आमचा मानस आहे. जर आम्ही याच्यात यशस्वी झालो तर आम्ही अजून विषाणूंबातही यशस्वी होऊ.'सीईओ लोनकारविच यांनी ते ब्रिटनमध्ये क्लिनिकल ट्रायल सुरू करणार असल्याची देखील माहिती दिली.

सध्या अव्वल स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open 2022) खेळून आपले विक्रमी २१ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याची नामी संधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाच्या सरकारने त्याच्या कोरोना लसीकरणाबाबत व्यवस्थीत माहिती दिली नाही म्हणून विजा रद्द केला. त्यामुळे त्याला मायदेशात परत पाठवण्यात आले.

Web Title: Novak Djokovic Huge Investment In Quantbiores Company Which Trying To Make Corona Medicine

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top