ICC Womens World Cup 2022  Sakal
क्रीडा

VIDEO : मॅच फिरवणारा रॉकेट थ्रो; पाकच्या पदरी पराभवाची हॅटट्रिक

सकाळ डिजिटल टीम

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान महिला संघाचा संघर्ष सुरुच आहे. भारतीय महिला संघाकडून मोठ्या फरकाने मार खाल्ल्यानंतर आता त्यांना सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान महिलांनी सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. पण अखेरच्या षटकात तीन विकेट्स गमावल्यामुळे त्यांच्या पदरी पुन्हा पराभव आला.

पहिल्यांदा बॅटिंग करताना दक्षिण आफ्रिका महिला संघाने निर्धारित 50 षटकात 229 धावा केल्या होत्या. आफ्रिकेकडून व्लावरदत (Wolvaardt) हिने सर्वाधिक 75 धावा केल्या. तिच्याशिवाय कर्णधार सुने लुइस Sune Luus (c) हिने संयमी 62 (102) अर्धशतक झळकावले. या दोघींच्या खेळीच्या जोरावरच दक्षिण आफ्रिका महिला संघाने 229 धावांपर्यंत मजल मारली होती.

या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानी महिला संघाची सुरुवात खराब झाली. अमीन अवघ्या 12 धावा करुन तंबूत परतली. सलामीची बॅटर नाहिदा खान (Nahida Khan) हिने 40 धावा करुन संघाचा डाव सावरला. बिस्माह मारुफला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर ओमैमा सोहिल ( Omaima Sohail) आणि निडा दार (Nida Dar) या दोघींनी सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. दोघींनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केल्यानंतर सोहिल 65 धावांवर बाद झाली. निडा दार जोपर्यंत मैदानात होती तोपर्यंत पाकिस्तानला विजयाची आस होती.

पण ती 49 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रन आउट झाली. दक्षिण आफ्रिकेनं फिल्डिंगच्या जोरावर सामना फिरवला. जर ही विकेट पडली नसती तर कदाचित निडा दारनं आपल्या संघाला पहिला विजय मिळवून दिला असता. आयाबोनगा हिच्या गोलंदाजीवर स्ट्राइकवर असलेल्या डायनानं उत्तम फटका खेळला. त्यानंतर दुहेरी धाव घेण्याचा पाकिस्तानी महिलांचा मनसूबा आफ्रिकनं महिलांनी उधळून लावला. सीमा रेषेवरुन ट्रायन हिने जबरदस्त थ्रो केला. गोलंदाजीला असेलल्या खाकाने चेंडू पकडत चपळाईनं स्टम्प उडवल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT