ICC WTC Points Table  E Sakal
क्रीडा

ICC WTC Points Table : भारताला फटका; पाकिस्तान टॉपला

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर WTC पॉइंट टेबलमध्ये मोठा उलटफेर

सुशांत जाधव

IND vs ENG: इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला 76 धावांसह डावाने पराभूत होण्याची नामुष्की ओढावली. या सामन्यातील विजयासह यजमान इंग्लंडने मालिकेत 1-1 बरोबरी साधली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या निकालानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये (ICC World Test Championship Points Table) मोठा उलटफेर झालाय.

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघाची पहिल्या क्रमांकावरुन थेट तिसऱ्या स्थानावर घसरण झालीये. भारताच्या खात्यात आता 14 गुण आहेत. भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी ही 38.88 असून ती पाकिस्तानपेक्षाही कमी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची मालिका ही दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपचा भाग आहे. लॉर्डसवरील विजयानंतर मिळालेले अव्वलस्थान टीम इंडियाने अल्पावधीतच गमावले आहे.

भारत आणि इंग्लंड या दोन संघांसह पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिप 2023 च्या दुसऱ्या हंगामाची सुरुवात केलीये. चारही संघाच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विजयाची नोंद झालीये. इंग्लंडच्या संघ विजयानंतर चौथ्या स्थानावरच आहे.

पाकिस्तान आघाडीवर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत पाकिस्तान संघाने दोन कसोटी सामने खेळले आहेत. यातील 1 सामन्यातील विजय आणि 1 सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानच्या खात्यात 12 गुण जमा आहेत. भारतीय संघापेक्षा त्यांच्या खात्यात दोन गुण कमी असले तरी मॅच विनिंग पर्सेंटेज 50 असल्यामुळे गुणतालिकेत त्यांनी आघाडीचे स्थान गाठले आले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसंदर्भातील नियम

कसोटी सामना जिंकणाऱ्या संघाला 12 गुण दिले जातात. सामना अनिर्णित राहिल्यात प्रत्येकी संघाला 4-4 गुण दिले जातात. या नियमावलीनुसार, भारत आणि इंग्लंड यांच्या खात्यात 16 गुण जमा व्हायला पाहिजे होते. पण सध्याच्या घडीला दोन्ही टीमच्या खात्यात 14-14 गुण आहेत. नॉटिंघमच्या मैदानात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघावर षटकांची गती कमी ठेवल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 2-2 गुण कपात करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT